आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1500 प्राणी हस्तगत:पुण्यात आंतरराष्ट्रीय प्राण्यांची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक; परदेशी कासवे आणि इग्वानासह 1500 प्राणी जप्त, सीमाशुल्क विभागाला सुपूर्त

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे रेल्वे पोलिसांनी आंतरराष्ट्रीय प्राण्यांची तस्करी करणाऱ्या टोळीचा भांडाफोड केला. रेल्वे प्रवास करून आंतरराष्ट्रीय प्राण्यांची तस्करी करणाऱ्या दोघांना लोहमार्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा पथकाने अटक केली. त्यांच्याकडून विदेशी 279 कासवे, 1 हजार 207 इग्वाना सरडे, 230 बेटा फिश जप्त करण्यात आली आहेत. तरुणकुमार मोहन (26) आणि श्रीनिवासन कमल (20) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. ते चेन्नईहून मुंबईला हे प्राणी घेऊन जात होते. त्यानंतर ते परदेशात पाठवणार असल्याचा संशय आहे. त्यांना हे प्राणी कुठून मिळाले आणि यात आणखी कुणा-कुणाचा सहभाग आहे याचा तपास सुरू आहे.

लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे गाड्यांतून विनापरवाना मालाची व प्राण्यांची तस्करी होत असल्याची गोपनिय माहिती लोहमार्ग पोलिस अधीक्षक सदानंद वायसे पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मौला सय्यद यांना सूचना देऊन रेल्वेगाड्यांवर पेट्रोलिंग करण्यास सांगितले होते. त्यानुसार मागील आठ ते दहा दिवसापासून पथके गस्तीवर होती.

दरम्यान पुणे ते लोणावळा प्रवासात चेन्नई एल टी टी एक्सप्रेसमधील A/1 बोगीमधून प्रवास करणारे दोघे संशयास्पदरित्या आढळून आले. त्यांच्याकडे चौकशी करून 4 ट्रॅव्हल बॅगा व दोन सॅगबॅगची तपासणी केली. त्यामध्ये कासव, इग्वाना जातीचे प्राणी व फायटर फिश आढळून आल्या. त्यांना प्राण्याची वाहतूक करत असलेबाबत विचारणा केली. त्यावेळी त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा वाहतूकीचा परवाना व कागदपत्रे नसल्याने दोघांना त्यांच्या बँगांसह ताब्यात घेण्यात आले.

आफ्रिकन स्पुरेंड टॉर्टोइस जातीची कासवे आहेत. इग्नावा हा सरड्यासारखा प्राणी आहे. या तस्कारांकडे 279 कासवे, 1207 इग्वाना, 230 बेटा फिश आढळून आले आहे. यातील काही प्राणी विदेशी असल्याने ते सीमाशुल्क विभागाच्या स्वाधीन करून अटक केलेल्या दोघांना सुद्धा सीमाशुल्क विभागाच्या हवाली करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...