आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिद्धू मुसेवाला खूनप्रकरण:पुणे पोलिसांतर्फे लॉरेन्स बिश्नोईची चौकशी; फरार आरोपी संतोष जाधवबाबत करणार विचारपूस

पुणे23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुख्यात गँगस्टर लाॅरेन्स बिश्नोई सध्या दिल्लीतील तिहार कारागृहात जेरबंद आहे. - Divya Marathi
कुख्यात गँगस्टर लाॅरेन्स बिश्नोई सध्या दिल्लीतील तिहार कारागृहात जेरबंद आहे.

राजस्थानमधील कुख्यात गुन्हेगार लाॅरेन्स बिश्नोई सध्या दिल्लीतील तिहार कारागृहात जेरबंद आहे. पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणात पुणे जिल्हयातील मंचर येथे राहणारा गुन्हेगार संताेष जाधव संशयित आराेपी आहे. त्याचा ठावठिकाणा शाेधण्यासाठी पुणे ग्रामीण पाेलिसांतर्फे बिश्नोई याची चौकशी करण्यात येणार आहे. त्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांचे पथक आज दिल्लीत गेले आहे. पुणे ग्रामीण पाेलिस अधीक्षक डाॅ.अभिनव देशमुख यांनी या माहितीस दुजोरा दिला आहे.

मंचूर येथे ऑगस्ट २०२१ मध्ये ओंकार बाणखेले या २६ वर्षीय तरुणाचा खून संताेष जाधव व त्याच्या साथीदारांनी केला हाेता. त्यानंतर जाधव हा फरार असून अद्याप त्याचा ठावठिकाणा लागलेला नाही. राजस्थानमधील लाॅरेन्स बिश्नोई टाेळीच्या संर्पकात ताे असल्याची माहिती पुणे ग्रामीण पाेलिसांना मिळाली हाेती. त्यानुसार पुणे पाेलीसांच्या पथकाने राजस्थानमध्ये जात त्याचा शोध घेतला होता. परंतु, ताे हाती लागला नाही. जाधव याच्या शाेधासाठी पुणे ग्रामीण पाेलीसांनी यापूर्वीच लूकआऊट नाेटिस काढली आहे. त्यामुळे आता लाॅरेन्स बिश्नोई याच्याकडे पुणे ग्रामीण पाेलीस संताेष जाधवबाबत सखाेल चाैकशी करणार आहे.

दरम्यान, संताेष जाधव याचा साथीदार साैरभ महाकाल यास पाेलीसांनी संगमनेर येथून चार दिवसांपूर्वी अटक केली आहे. मुसेवाला प्रकरणात महाकालही संशयित आराेपी आहे. त्याची चाैकशी करण्यासाठी पंजाब पाेलिसांचे एक पथक पुण्यात दाखल झाले आहे. पुणे पोलिसांतर्फे महाकालची चौकशी करण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...