आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिंडोरीमध्ये दरोडेखोरांच्या आंतरराज्य टाेळीला अटक:चार जणांना अटक, 4  लाखांचा माल हस्तगत

दिंडोरी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील ढकांबे येथील बंगल्यात प्रवेश करून बंदुकीचा धाक दाखवत सोन्याचांदिचे दागिने व रोख रक्कम असा १७ लाख ३४ हजाराची धाडसी लूट करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखा व दिंडोरी पोलिसांना यश आले. लुटीतील ४ लाख ६० हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. यात चार संशयितांना अटक करण्यात अाली आहे. उर्वरीत फरार साथीदारांचा शोध सुरू आहे.

दिंडोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ढकांबे मानोरी शिवारातील रतन शिवाजी बोडके यांच्या बंगल्यात १२ डिसेंबर २०२२ ला मध्यरात्रीच्या सुमारास सहा संशयितांनी प्रवेश करत बंदुकीचा धाक दाखवत व जीवे मारण्याची धमकी देत २८ तोळे साेन्याचे दागिणे, साडेआठ लाख रुपये रोख असा एकूण १७ लाख ३४ हजाराच्या ऐवजाची लूट केली हाेती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी स्थानिक गुन्हे शाखा व दिंडोरी पोलिसांवर तपासाची जबाबदारी सोपवली हाेती.

बातम्या आणखी आहेत...