आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1 लाखांच्या 150 लोखंडी प्लेटा जप्त:बांधकामाच्या लोखंडी प्लेटा चोरल्याप्रकरणी दोघांना पोलिसांकडून अटकेत

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

इमारतीच्या बांधकामासाठी लागणार्‍या लोखंडी प्लेटा चोरणार्‍या दोघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून १ लाख १० हजार रुपयांच्या १५० लोखंडी प्लेटा जप्त करण्यात आल्या आहेत.

दत्ता धनाजी पाटोळे (२०, रा. पद्मावती,पुणे), साहील दत्ता ढावरे (१९, रा. पद्मावती,पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहेत अशी माहिती पोलिसांनी मंगळवारी दिली आहे.

भारती विद्यापीठ परिसरातील जांभूळवाडी रोड येथील एका इमारतीतून लोखंडी प्लेटा चोरी गेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस तपास करत होते. घटनास्थळावरील सीसीटीव्हींची तपासणी केली असता एका अल्पवयीनाने आपल्या साथीदारांच्या मदतीने चोरी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानूसार अल्पवयीनाला ताब्यात घेवून चौकशी केली असता त्याने पाटोळे आणि ढावरे यांच्या मदतीने चोरी केल्याचे सांगितले. त्यानूसार पोलिसांनी पाटोळे, ढावरे यांना अटक केली. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी लोखंडी प्लेटा चोरल्याचे कबूल केले. त्यांच्याकडून १५० प्लेटा जप्त करण्यात आल्या आहेत.

सदरची कारवाई स्मार्तना पाटील पोलीस उपआयुक्त परिमंडळ २, सुषमा चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहीरट, तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस उप निरीक्षक धिरज गुप्ता, पोलीस अमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, अशिष गायकवाड, सचिन सरपाले, अवधुत जमदाडे, शैलेश साठे, चेतन गोरे, मंगेश पवार, निलेश ढमढेरे, शिंदे, अभिजीत जाधव, निलेश खैरमोडे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, राहुल तांबे यांच्या पथकाने केली आहे.

बातम्या आणखी आहेत...