आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा''अनेक मुलांना मी छेडछाड केल्याने मारले आहे. मात्र, माझ्यासारख्या बेधडक मुली कमी आहे. महिलांबाबत घडणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टी बाबत अनेक गोष्टी मुली कोणाशी बोलू शकत नाही. त्याकरिता सोशल मीडिया वापर महत्वपूर्ण आहे. आपल्या समस्या लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी विविध मार्गाचा अवलंब करणे गरजेचे आहे'' असे मत अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने शुक्रवारी व्यक्त केले.
सोशल मीडिया मोठी ताकद
सोशल मीडियाचा वापर आपल्यातील कला गुण दाखवण्यासाठी तरुणांना चांगल्या प्रकारे व्यासपीठ आहे. सोशल मीडियात मोठी ताकद असून एखाद्या गोष्टीने देश हादरला जातो. बेरोजगारी, महिला सुरक्षितता, भ्रष्टाचार याबाबत बोलण्यास सामान्य माणूस घाबरतो, परंतु त्याचे मुद्दे मांडण्यासाठी वेगळ्या प्रकारचे मार्ग अवलंबणे आवश्यक आहे.
तरुणांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी आयोजित ' इंडियाज रायझिंग टॅलेंट' या राष्ट्रीय स्पर्धेचे उद्घाटन कार्यक्रमावेळी बोलत होती. यावेळी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड,अखिल भारतीय युवक काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी. व्ही,राष्ट्रीय सचिव कृष्णा अल्वारु, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष कुणाल राऊत,उपाध्यक्ष शिवराज मोरे,हास्य कलाकार मकरंद टिल्लू, मिमिक्री कलाकार योगेश सुपेकर उपस्थित होते.
छेड काढणाऱ्यांना मी मारले
तेजस्विनी म्हणाली, महिला सुरक्षा बाबत बोलताना मी सांगते, अनेक मुलांना मी छेडछाड केल्याने मारले आहे. मात्र, माझ्यासारख्या बेधडक मुली कमी आहे. महिलांबाबत घडणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टी बाबत अनेक गोष्टी मुली कोणाशी बोलू शकत नाही. त्याकरिता सोशल मीडिया वापर महत्वपूर्ण आहे.
गल्लीबोळात टॅलेंट
आज गल्ली बोळात बुद्धिमत्ता आहे मात्र, ते योग्य मार्गाने समोर येणे आवश्यक आहे. संपूर्ण महाराष्ट्रासाठी हे चांगल्या प्रकारे व्यासपीठ आहे. देश घडवण्यासाठी हा उत्तम मार्ग आहे.
प्रत्येकात काही ना काही कला
अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड म्हणाली, खूप कमी वेळात अधिक कलागुण दाखावण्याची संधी मला मिळाली आहे. प्रत्येकात काही ना काही कलागुण असते, केवळ ते प्रदर्शित करण्यासाठी व्यासपीठ असणे आवश्यक असते. शाळेत असताना सांगितले जाते, तुम्ही सर्व गोष्टीत सहभागी व्हा. मात्र खऱ्या आयुष्यात त्याचा वापर झाला पाहिजे. आपण नशीबवान आहे कारण भारतात जन्मास आलो आहे, विविध कला आपण दाखवू शकतो.
प्रश्न कलेद्वारे मांडा
वेगवेगळ्या वातावरणात लोक देशात राहतात आणि त्यांचे कलागुण दाखवण्यासाठी व्यासपीठ निर्माण झाले पाहिजे. एक तरुणी म्हणुन मला समजात जावे लागते त्यावेळी समाजाचे प्रश्न समोर मांडले गेले पाहिजे. महिला सुरक्षा, महागाई, बेरोजगारी आदी प्रश्नाबाबत भूमिका आपण कलेच्या माध्यमातून मांडली पाहिजे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.