आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात पुढे जायचे असेल तर विज्ञानवादी भूमिका स्वीकारावी लागेल. व्यक्तीचे मन तयार हाेण्यासाठी भाकडकथांपेक्षा विज्ञानााधारित गाेष्टी अधिक प्रमाणात जाणणे महत्त्वाचे आहे. विज्ञानामुळे आपण चंद्रावर, मंगळावर जाताे. हे अशक्य बदल आपण प्रत्यक्षात आणले आहेत. हा प्रकल्प पाहिल्यावर आत्मविश्वास वाढेल आणि प्रोत्साहन मिळेल, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी गुरुवारी व्यक्त केले.
बारामती येथे सायन्स अँड इनाेव्हेशन सेंटरच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बाेलत हाेते. या वेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ अनिल काकोडकर, उद्याेगपती गाैतम अदानी, खासदार सुप्रिया सुळे, राजेंद्र पवार उपस्थित हाेते. पवार म्हणाले, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांत विज्ञानाची गोडी निर्माण करणे आणि भविष्यात या भागातील शास्त्रज्ञ घडवण्याच्या दृष्टीने सायन्स अँड इनाेव्हेशन सेंटर महत्त्वाचे आहे. पुढील वर्षीच्या अर्थसंकल्पात राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात सायन्स अँड इनाेव्हेशन सेंटर उभारले जातील. त्याबाबतची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात येईल. प्रदर्शनात सहभागी हाेण्यासाठी ३६ जिल्ह्यातील २०५ प्रकल्पांची निवड करण्यात आली. विद्यार्थ्यांना या प्रदर्शनातून विज्ञानाची आवड निर्माण हाेईल अशी अपेक्षा आहे. जगभरात शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल हाेत आहेत. भारतातील शिक्षणाच्या तुलनेत परदेशातील शिक्षण पद्धत काैशल्यााधारित असून आपल्याला प्रगती करण्यासाठी विज्ञानावर आधारित शिक्षण सुरू करणे काळाची गरज आहे.
राज्यात ५ ठिकाणी इनोव्हेशन सेंटर : अनिल काकोडकर
अनिल काकोडकर म्हणाले, एखादी गाेष्ट समजली नाही तर त्याबाबत प्रश्न विचारत राहणे व आपल्या शंकांचे निरासन करणे महत्त्वाचे ठरते. सध्याचे जग हे संशाेधनाचे असून नवीन कल्पना समोर आल्या पाहिजेत. त्यासाठी कठाेर तयारी करण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी करावा. महाराष्ट्रात यापूर्वी पाच ठिकाणी सायन्स अँड इनाेव्हेशन सेंटर्स उभारली आहेत. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात एक केंद्र उभे राहावे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.