आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासिंधी भाषा, संस्कृती आणि परंपरेला समृद्ध वारसा आहे. हा वारसा जतन करून नव्या पिढीला त्याची गोडी लावण्यासाठी त्याचे संवर्धन व्हावे. सिंधू सेवा दलाने गेल्या 33 वर्षात विविध समाजोपयोगी उपक्रम राबवले आहेत. त्यातून कुटुंब, उद्योग, व्यवसाय याबरोबरच सिंधी समाजाचा सेवाभावही तितकाच उल्लेखनीय असल्याचे दिसते असे मत ज्येष्ठ समाजसेवक व लेखक डॉ. राम जवाहारानी यांनी रविवारी व्यक्त केले आहे.
सिंधू सेवा दलाच्या 2022-25 या तीन वर्षांच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीच्या सत्कारावेळी डॉ. राम जवाहारानी बोलत होते. यावेळी सिंधू सेवा दलाच्या अध्यक्षपदी अशोक वासवानी, उपाध्यक्षपदी पुरुषोत्तम पर्यानी, सचिवपदी सचिन तलरेजा, तर खजिनदारपदी राजेंद्र फेरवानी, सहसचिवपदी किरण फेरवानी, सहखजिनदारपदी निलेश फेरवानी तर जनसंपर्क अधिकारी म्हणून देवेंद्र चावला यांची एकमताने निवड झाली आहे. कार्यकारिणी सदस्य म्हणून माजी अध्यक्ष डॉ. पीटर दलवानी, मनोहर फेरवानी, सुरेश जेठवानी, दीपक वाधवानी, विजय दासवानी, जय पिंजानी व हरीश पिंजानी यांची निवड झाली आहे.
बोट क्लब येथे झालेल्या सदर कार्यक्रमावेळी सिंधू सेवा दलाच्या वतीने एएनपी केअर फाउंडेशनच्या सहकार्याने 'ग्लोबल सिंधी' या मॅट्रीमोनी ऍपचे अनावरण करण्यात आले. सिंधू सेवा दलाचे संस्थापक सदस्य ईश्वर कृपलानी, उद्योजक सुनील अडवाणी, घनश्याम सुखवानी आदी उपस्थित होते. मनोहर फेरवानी, ईश्वर कृपलानी यांनीही मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश जेठवानी यांनी केले तर आभार विजय दासवानी यांनी मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.