आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विवाहबाह्य संबंध:महिला पोलिसानेच दिली पतीची सुपारी

सातारा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पतीचे असलेले विवाहबाह्य संबंध आणि त्याच्यावर असलेल्या प्रेमातून पोलिस सेवेत असलेल्या पत्नीने पतीच्या हत्येची सुपारी सराईत गुन्हेगारांना दिली. खुनाच्या या गुन्ह्यातील संशयितांना गजाआड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले. सातारा न्यायालयाने संशयितांना १० फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. अमित आबासाहेब भोसले (रा शुक्रवार पेठ, सातारा) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

अभिषेक विलास चतुर (२७, राहणार नांदगिरी, ता. कोरेगाव), शुभम हिंदुराव चतुर (२७, रा. कोरेगाव, सध्या पुणे), राजू भीमराव पवार (२६, रा. पंताचा गोट, सातारा), सचिन रमेश चव्हाण (रा. मुळशी, पुणे), सूरज ज्ञानेश्वर कदम (२७, रा. खेड, ता. सातारा. सध्या रा. पुणे) यांना अटक केली. माहितीनुसार, २४ जानेवारीला रात्री १२.३० वाजता वाढे गावच्या हद्दीत पुणे-कोल्हापूर महामार्गावरील सर्व्हिस रोडलगत अमित भोसलेवर अज्ञातांनी मोटारसायकलवर येऊन गोळीबार करून खून केला होता. प्रकरणाचा पोलिसांनी अखेर छडा लावला.

बातम्या आणखी आहेत...