आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात महिलेवर हल्ला करुन चोरट्यांनी लांबवली पर्स:7 हजारांचा मुद्देमाल लंपास; नागरिकांनी चोराला पोलिसांकडे केले स्वाधीन

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यात चोरींचे प्रमाण दिवेंदिवस वाढले आहे. अशातच चिंचवड परिसरात राहणाऱ्या एका महिलेवर हल्ला करुन दोन चोरट्यांना पर्स पळवल्याची घटना शनिवारी (03 सप्टेंबर) घडली. तसेच यावेळी नागरिकांनी भामट्या चोऱ्याचा पाठलाग करुन एका आरोपीला पोलिसांकडे स्वाधीन केले. मात्र, एका भामट्या चोरट्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांना सोमवारी दिली.

काय आहे घटना?

मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय परमेश्वर लवटे (वय-22,रा.चिखली,पुणे) या आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. त्याचा साथीदार सुनिल मधुकर अर्जुन (वय-25,रा.चिखली,पुणे) याचा पोलिस शोध घेत आहे. याबाबत पीडित महिलेने चिखली पोलिस ठाण्यात दोन्ही आरोपी विरोधात तक्रार दाखल केली आहे. महिला ही तीन सप्टेंबर रोजी संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास चिंचवड परिसरातील विठ्ठल मंदिराच्या बाजूस राहत असलेली तक्रारदार महिला ही तिच्या पती सोबत मिळून पतीचा मित्र नारायण अक्कड (वय-58, रा.संभाजीनगर,चिंचवड,पुणे) यांच्या घरी सत्यनारायणची पुजा असल्याने राहते घरातून दोघेजण पायी जात होते. त्यावेळी मोटारसायकलवरून आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींपैकी मागे बसलेल्या अक्षय लवटे या आरोरपीने महिले जवळील लेडीज पर्स जबरदस्तीने हिसकवण्याचा प्रयत्न केला.

महिलेवर केला हल्ला

परंतु महिलेने सदर पर्स ही उजव्या हाताने घट्ट धरली असता, त्या इसमाने त्याच्याजवळ असलेल्या धारदार वस्तूने महिलेच्या उजव्या हाताचे मनगटावर मारुन तिला जखमी केले. त्यानंर तिच्या हातातील एक हजार रुपये किंमतीची पर्स त्यातील पाच हजार रुपये किंमतीचा विवो कंपनीचा मोबाईल व एक हजार रुपये रोख असा एकूण सात हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जबरदस्तीने चोरी करुन नेला. आरोपी अक्षय लवटे हा जबरदस्तीने पर्स हिसकावून घेऊन गेला व त्याने मोटारसायकल चालवणाऱ्या सुनिल अर्जुन या आरोपीकडे पर्स देऊन ते दोघे निघून गेले. थोड्या अंतराजवळ त्यांनी त्यांची मोटारसायकल थांबवुन मागे बसलेला अक्षय लवटे हा मोटारसायकलवरुन उतरुन पळु लागल्याने त्यास त्याचा पाठलाग करणाऱ्या 2 व्यक्तींना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. याबाबत पुढील तपास चिंचवड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक एस गुमाने करत आहे.

बातम्या आणखी आहेत...