आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पालखी सोहळा:केवळ 50 लोकांनी काढली दिंडी, 17 दिवसांनंतर हेलिकॉप्टरने पंढरपूरला जाणार पादुका; पंढरपूरला जत्रा नाही

पुणे9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 800 वर्षांच्या पालखी सोहळ्यांमध्ये तीन वेळा कमी झाली भक्तांची संख्या

श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीने शुक्रवारी देहू येथून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले. दरवर्षी पालखी सोहळ्याला लाखोंच्या संख्येने लोक सहभागी होतात. परंतु, यावर्षी कोरोना संक्रमणामुळे केवळ 50 लोकांना दिंडी काढण्याची संधी मिळाली. लॉकडाउनच्या कारणास्तव पालखी केवळ प्रतिकात्मकरित्या मंदिरातून बाहेर निघाली. काही अंतरावर गेल्यानंतर पुन्हा मंदिर परिसरात परत आणण्यात आली. पालखी सोहळ्यापूर्वी शुक्रवारी महापूजा देखील करण्यात आली. यानंतर इनामदार वाड्याच संत तुकाराम महाराजांच्या पादुकांची पूजा करण्यात आली.

याच पादुका हेलिकॉप्टरने पंढरपूरला नेल्या जाणार आहेत

हेलीकॉप्टरने नेणार पादुका

मंदिर प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, पालखी 17 दिवसांनंतर देहू येथील तुकाराम महाराज मंदिरातच राहणार आहे. यानंतर शेवटच्या दिवशी तुकारामांच्या पादुका हेलिकॉप्टरने पंढरपूरला नेल्या जाणार आहेत. सामान्य वेळी ही यात्रा 21 दिवसांची असते. यात लोक देहू, आळंदीसह राज्यातील अनेक भागांना सर करत पायी चालत पंढरपूरला येतात. पंढरपुरात आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान विठ्ठलाचे दर्शन घेऊन दिंडीचा समारोप होतो. शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री आपल्या पत्नीसह पंढरपुरात पूजेत सहभागी होतात. आता संक्रमणाच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यात सहभागी होणार का हे अद्याप स्पष्ट नाही.

पालखी सोहळ्यात मंदिराची फुलांनी सजावट करण्यात आली. एरवी या ठिकाणी पाय ठेवायला सुद्धा जागा नसते.

800 वर्षात तिसऱ्यांदा घटली भक्तांची संख्या

गेल्या 8 शतकांपासून तुकाराम पालखीची परमपरा सुरू आहे. यात भक्तांची संख्या कमी होण्याची ही 800 वर्षातील तिसरी वेळ आहे. यापूर्वी 1912 मध्ये प्लेग या रोगाने आणि 1945 मध्ये दुसऱ्या महायुद्धामुळे या ठिकाणी भक्तांची संख्या कमी झाली होती. 2019 च्या पालखी सोहळ्याला या ठिकाणी जवळपास 5 लाख लोक आणि 350 दिंड्या सहभागी झाल्या होत्या.

गेल्या अडीच महिन्यांपासून मंदिरात भाविकांना प्रवेश बंद आहे.

पंढरपूरची जत्रा रद्द

पंढरपूरमध्ये एका वर्षात 4 मोठ्या जत्रा भरतात. परंतु, यावर्षी कोरोना व्हायरसमुळे जत्रा भरणार नाही. एरवी लाखोंच्या संख्येने वारकरी पंढरपूरला एकत्र येतात. यामध्ये केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर देश विदेशातील भक्तांचा देखील समावेश असतो. यावर्षी मात्र, पंढरपूरला कुठलीही जत्रा भरणार नाही. 

हा फोटो देहू येथील भगवान तुकाराम मंदिरातील आहे. अशाच भगवान विठ्ठल आणि रुख्मिणीच्या प्रतिमा पंढरपूरात देखील आहेत.

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी यात्रेसारख्याच जवळपास 100 विविध संतांच्या जन्मस्थळावरून किंवा समाधीस्थावरून पालख्या पायी पंढरपूरात पोहोचतात. 

बातम्या आणखी आहेत...