आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनजागर यात्रा:उद्या राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जनजागर यात्रेचा पुण्यात शुभारंभ

पुणे24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुरू केलेल्या मुलींच्या पहिल्या शाळेला एक जानेवारी २०२३ रोजी १७५ वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने ४ जानेवारी २०२३ पासून संपूर्ण राज्यात जनजागर यात्रा सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा खासदार फौजिया खान, शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते प्रदीप देशमुख, वैशाली नागवडे, मृणालिनी वाणी, आशा मिरगे उपस्थित होते.

चव्हाण म्हणाल्या, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षणातून तत्कालीन समाज सुशिक्षित झाला. त्यांनी केलेल्या शिक्षणाच्या जागरामुळे बहुजन समाजावर होत असलेल्या अन्याय- अत्याचाराविरोधात समाज पेटून उठला व समाजातील अनिष्ट रूढी परंपरा संपवण्यात आल्या व एका आदर्श समाजाची निर्मिती फुले दांपत्याकडून करण्यात आली. आजच्या काळात गेल्या आठ वर्षांपासून मोदी सरकार सर्वसामान्य जनतेवर करत असलेल्या महागाई- बेरोजगारीच्या अन्याय व अत्याचाराविरोधात देखील अशाच प्रकारचा जागर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने करण्यात येत असून, संपूर्ण राज्यभरात महिला भगिनींकडून याबाबत जागर यात्रा करण्यात येणार असून ही यात्रा महाराष्ट्राच्या प्रत्येक शहर व तालुक्यात जाणार आहे.

गेल्या ९ वर्षांत गॅस सिलिंडर, जीवनावश्यक वस्तू , पेट्रोल , डिझेल सीएनजी यांच्या किमतींमध्ये झालेली वाढ, खासगी क्षेत्रातील नोकऱ्यांवर आलेली कुऱ्हाड, बेरोजगारीचे संकट, महाराष्ट्रातून कंपन्या इतर राज्यांमध्ये पळवण्याचे सुरू असलेले उद्योग अशा विविध मुद्द्यांवर समाजाचे जागर करण्याचे काम ही जनजागर यात्रा करणार आहे.

बातम्या आणखी आहेत...