आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकसबा, पिंपरी-चिंचवड पोटनिवडणुक भाजपने प्रतिष्ठेची करुन ठेवली. त्यामुळे यातील एक जरी जागा महाविकास आघाडीला मिळाली तर हा भाजपसाठी मोठा धक्का असेल, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी दिली आहे. तर जयंत पाटलांनी प्रचारात भाजपविरोधी वातावरण दिसल्याने महाविकास आघाडीच्या विजयाचा दावा केला.
पुण्यातील कसबापेठ विधानसभा मतदार संघामध्ये भाजपच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडमध्ये भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे या दोन्ही ठिकाणी झालेल्या पोटनिवडणुकीचा निकाल आज लागणार आहे. सकाळी 8 वाजेपासून मतमोजणीला सुरूवात झाली. सकाळी अकरा वाजेपर्यंत निकाल हाती येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
भाकित वर्तवणे अवघड
निकालाच्या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ म्हणाले, एवढ्या लवकर निवडणुकीचे भाकित वर्तवणे अवघड आहे. मात्र भाजपने ही निवडणुक प्रतिष्ठेची केली. या दोन्ही जागा भाजपकडे होत्या आणि यातील एक जरी जागा महाविकास आघाडीकडे आली तर हा भाजपला धक्का असेल.
भाजपविरोधी वातावरण
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री जयंत पाटील यांनी देखील निकालाच्या पार्श्वभूमीवर आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, कसबा, पिंपरी-चिंचवडमध्ये प्रचार करताना भाजपविरोधी वातावरण दिसले. महागाईमुळे पुणेकर परेशान आहेत. सध्याच्या प्रचलित राजकारणामुळे जनता त्रस्त आहे. मतविभागणीचा फायदा कोणाला होतो हे तास दोन तासात कळेलच. देखील वेगळी परिस्थिती नव्हती.
निवडणुकीत चुरस
कसबा व चिंचवड या दोन्ही मतदार संघात भाजप विरुद्ध काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशी लढत होत आहे. तर राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील भाजपला पाठिंबा दिला आहे. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीनेही चिंचवडमध्ये अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना पाठिंबा दिला असून त्यामुळे या निवडणुकीत चुरस वाढवली होती. या सर्व पार्श्वभूमीवर आजचा निकाल महत्त्वाचा मानला जातोय.
पोटनिवडणूक निकाल
पुण्यातील कसबापेठ विधानसभा मतदार संघामध्ये भाजपच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडमध्ये भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे या दोन्ही ठिकाणी झालेल्या पोटनिवडणुकीचा निकाल आज लागणार आहे. सकाळी 8 वाजेपासून मतमोजणीला सुरूवात झाली. सकाळी अकरा वाजेपर्यंत निकाल हाती येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. वाचा सविस्तर
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.