आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Jayant Patil On Shinde Fadnavis Governmen: The Government Wastes Its Time In Managing The Supporting MLAs; Criticism Of Jayant Patil, State President Of 'Nationalist'

उद्योग गुजरातच्या घशात:समर्थक आमदार सांभाळण्यातच सरकारचा वेळ वाया जातो; 'राष्ट्रवादी'चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची टीका

पुणे24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील अनेक गुंतवणुकीचे उद्योग प्रकल्प राज्या बाहेर जात आहेत. महाराष्ट्रातून जे प्रकल्प राज्याबाहेर गेलेले आहेत, ते परत आणण्यासाठी सध्याचे राज्य सरकार कोणतेही प्रयत्न करताना दिसत नाही.

सरकारचा वेळ केवळ समर्थक आमदार सांभाळण्यातच जात आहे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गुरुवारी लगावला.

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पुणे शहर तर्फे राज्यातील ईडी सरकारने पोलिस भरतीवर स्थगिती आणली. महाराष्ट्रात येणारे अनेक उद्योगधंदे गुजरातच्या घशात घालण्याचे काम सध्या चालू आहे. राज्यातील तरुणांना बेरोजगारीच्या खाईत लोटण्याचा महाराष्ट्र विरोधी उद्योग चालवणाऱ्या शिंदे - फडणवीस सरकारच्या विरोधात नवी पेठ येथील लालबहादूर शास्त्री रस्ता याठिकाणी निषेध आंदोलन आयोजित केले होते त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते प्रदीप देशमुख, युवक अध्यक्ष किशोर कांबळे,युवक कार्याध्यक्ष मनोज पाचपुते,अजिंक्य पालकर, रूपाली ठोबरे, वेणू शिंदे उपस्थित होते.

पाटील म्हणाले, राज्यातील पोलीस भरती संदर्भातील निर्णय राज्य सरकारने तातडीने घेऊन तरुणांना दिलासा द्यावा. केवळ महाविकास आघाडी सरकारच्या काळातील निर्णय रद्द करून सरकार राज्याला अधोगतीकडे नेत आहे. 75 हजार लोकांना रोजगार उपलब्ध करून देऊ हे राज्य सरकार सांगत असले, तरी ती केवळ तरुणांच्या डोळ्यात धुळफेक करणारी कृती आहे. राज्यातील पुणे, अहमदनगर, सातारा, नाशिक आदी भागातील गुंतवणुकीचे मोठे प्रकल्प निर्माण झाले असते तर मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्धता झाली असती. मात्र, सरकारच्या नाकर्तेपणामुळे हे प्रकल्प राज्याबाहेर गेले आहेत.

राज्यातील नवतरुणांची, सुशिक्षतांची त्यामुळे निराशा झालेली आहे. त्याचप्रमाणे राज्याचे अतोनात आर्थिक नुकसान झाले असून तरुणांनी राज्य सरकारला या संदर्भात माफ करू नये. तरुणांनी ताकदीने राज्यातील एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकार विरोधात आवाज उठवावा आणि आंदोलन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...