आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी इंटरव्ह्यू:आयआयटीमध्ये टॉप करणाऱ्या पुण्यातील चिरागचे मंगळावर घर बनवण्याचे स्वप्न; अमेरिकेत इंजीनिअरिंग करतोय, पण काम भारतात करायचे आहे

पुणे7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हे लक्ष्य गाठण्यासाठी चिराग 2 वर्षे मोबाइल आणि टीव्हीपासून दूर राहिला होता
  • 9वीत असताना आयआयटीची तयारी सुरू केली होती, रोज 8-12 तास अभ्यास करायचा

इंडियन इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (IIT) दिल्लीने JEE अॅडवांस 2020 परीक्षेचा 7 दिवसानंतर निकाल जाहीर केला. यात पुण्यातील 18 वर्षीय चिराग फलोरने AIR-1 मिळवला आहे. चिरागने 396 पैकी 352 मार्क्स मिळवले. या यशानंतर चिरागच्या धनकवडीमधील घरी जल्लोषाचे वातावरण आहे. कोरोनामुळे प्रत्यक्ष न येता लोक फोन आणि व्हिडिओ कॉलद्वारे अभिनंदन करत आहेत. जेईईमध्ये टॉप करुनही चिराग देशातील कोणत्याच इंस्टीट्यूटमध्ये अॅडमिशन घेणार नाही.

8 ते 12 तास अभ्यास करायचा

दैनिक भास्करला दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये चिरागने सांगितले की, चांगले मार्क येणार हे माहित होते, पण देशात पहिला येईल, याची आशा नव्हती. चिराग आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, बहिन, शिक्षक आणि आकाश इंस्टीट्यूटला देतो. चिरागने सांगितले की, आयआयटीची तयारी त्याने 9वीत असताना सुरू केली होती. दररोज, 8 ते 12 तास अभ्यास करायचा.

नरेंद्र मोदी चिराग ला म्हणाले होते- जे ठरवले, ते पूर्ण केल्याशिवाय हार मानू नको

या वर्षी जानेवारीमध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते बालशक्ती पुरस्कारा मिळालेल्या चिराग फलोरची पंतप्रधान नरेंद्र मोदींशी भेट झाली आहे. तेव्हा चिराग म्हणाला होता,"पंतप्रधानांना भेटून मला खूप गर्व वाटत आहे. ते माझे रोल मॉडल आहेत. ज्याप्रकारे ते देशाबद्दल विचार करतात, त्याचप्रकारे मी विचार करतो. त्या भेटीवेळी ते मला म्हणाले होते- जे ठरवले आहे, ते पूर्ण केल्याशिवाय हार मानू नकोस."

टॉप करुनही देशातील कोणत्याच कॉलेजमध्ये अॅडमिशन घेणार नाही

आयआयटीमध्ये टॉप करुनही चिराग देशातील कोणत्याच इंस्टीट्यूटमध्ये अॅडमिशन घेणार नाही. चिरागने यापूर्वीच मॅसाचुसेट्स इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (एमआयटी, अमेरिका)मध्ये इंजीनियरिंगला अॅडमिशन घेतले आहे. सध्या कोरोना आणि लॉकडाउनमुळे तो तिथे जाऊ शकला नाही. सध्या तो ऑनलाइन क्लास करत आहे.

भारतीयांसाठी मंगळावर घर बनवणार

चिरागने सांगितले की, शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याचे स्वप्न मंगळ ग्रहावर जाण्याचे आहे. त्याला मंगळावर भारतीयांसाठी घरे बनवायची आहेत. चिराग म्हणाला की, हे अवघड आहे, पण अशक्य नाही.

बातम्या आणखी आहेत...