आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुमचे देव सैतान, त्यांना पाण्यात बुडवा:आळंदीत धर्मांतराच्या घटनेने खळबळ; येशूचे रक्त म्हणून पाजला द्राक्षांचा रस, VIDEO व्हायरल

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

“तुमचे देव सैतान आहेत, त्यांना पाण्यात बुडवा’ असे सांगत दुसरा धर्म स्वीकारण्यास भाग पाडल्याप्रकरणी आळंदी आणि दिघी अशा दोन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येशूचे रक्त असल्याचे सांगून द्राक्षाचा रस पाजत दुसरा धर्म स्वीकारण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा धक्कादायक प्रकार आळंदी परिसरात उघडकीस आला आहे. याबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीवर आळंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली आहे.

सदर गुन्ह्याचा अनुषंगाने या संदर्भातील घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आळंदी रस्तावरील साठे नगर परिसरामध्ये हा प्रकार घडला आहे. याबाबत तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत उद्धव नागनाथ कांबळे यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानंतर सुधाकर बाबुराव सूर्यवंशी (६५, रा. धानोरी, पुणे) याच्यासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या महिलेच्या हातामध्ये एक ताट असून त्यात लाल रंगाचे पाणी असलेले ग्लासही दिसत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे लाल पाणी म्हणजे द्राक्षाचा रस आहे. ते येशूचे रक्त म्हणून दिले जात असल्याचे समोर आले आहे. आळंदी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील गोडसे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी आरोपी सुधाकर सूर्यवंशी याच्यावर दोन्ही पोलिस ठाण्यात १५४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन धर्मात द्वेष निर्माण करून जातीय तेढ केल्याप्रकरणी सदर गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी तपास सुरू आहे.

आरोपी म्हणायचा तुमचे आजार बरे करताे
आरोपी सुधाकर सूर्यवंशी हा त्याच्या दोन साथीदारांसह झोपडपट्टी परिसरात “ख्रिश्चन धर्माच्या प्रार्थनेने तुमचे आजार बरे करतो. तुम्ही येशूची पूजा करा, तुमच्या आर्थिक आणि आरोग्याच्या समस्या दूर होतील. तसेच हिंदू धर्म सोडून तुम्ही ख्रिश्चन धर्म स्वीकारा’ असा आग्रह करत असल्याची तक्रार पोलिसांना प्राप्त झाली आहे. व्हिडिओमध्ये दिसणारी मेरीनाथन या महिलेला ही पोलिसांनी शोधून काढले असून तिला चौकशीसाठी पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले आहे. त्याचप्रमाणे सूर्यवंशी याचाही पोलिस शोध घेत आहेत. याबाबत आळंदी पोलिस आरोपींसह इतरांचीही माहिती घेत असल्याचे सांगण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...