आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरट्यांची टोळी जेरबंद:संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज पालखी साेहळयात भाविकांचे दागिने केले लंपास

पुणे8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देहू व आळंदी येथून पंढरपूरला प्रस्थान करणाऱ्या संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर पालखी सोहळयात भाविकांचे दागिने चोरणारी टोळी पुणे गुन्हे शाखेच्या युनिट सहाच्या पथकाने जेरबंद केली आहे. 4 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांनी पुणे शहर व पिंपरी चिंचवड शहरात केलेले चैन चोरीचे १८ गुन्हे उघडकीस आल्याचची माहिती अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी दिली आहे.

गर्दीचा गैरफायदा घेत चोरी

शंकर शिवाजी पवार (वय २३,रा.पाथर्डी, अहमदनगर), महेंद्र सुरेश अरगडे (२६, रा.पाथर्डी, अहमदनगर), नितीन छगन काकडे (२२,रा.पाथर्डा, अहमदनगर) व प्रशांत छगन टाक (२६,रा. पाथर्डा, अहमदनगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका सोनसाखळी चोरीच्या गुन्हयाचा तपास गुन्हे शाखेचे युनिट सहाचे पथक करत होते. तपासादरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की, संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या पुण्यातून पंढरपुरकडे जात असताना पालखी मार्गावर तसेच विसावा ठिकाणी दर्शनासाठी लाखो भाविक येत असतात. त्यामुळे तेथे झालेल्या गर्दीचा गैरफायदा घेऊन लोकांचे गळयातील सोन्याचे दागिने बळजबरीने चोरणारे आरोपी शंकर पवार व महेंद्र अरगडे हे आळंदी-पुणे रस्त्यावर थांबलेले आहे.

दागिने, मोबाईल जप्त

माहिती मिळताच युनिट सहाच्या पथकाने सापळा लावून संबंधित दोन आरोपी शंकर पवार व महेंद्र अरगडे यांना सुरुवातीला ताब्यात घेतले. त्यांच्याकडील चाैकशीत त्यांचा साथीदार नितीन काकडे यासही पोलिसांनी अटक केली. त्यांनी पालखी मार्गावर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या गर्दीत सोन्याचे दागिने चोरल्याची कबुली दिली. चोरलेले दागिने त्यांनी प्रशांत टाक यास विक्री केल्याचे सांगितल्याने पोलिसांनी त्यालाही अटक केली. त्याच्या ताब्यातून चोरीचे एकूण २४ तोळे वजनाचे १२ लाख २४ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त करुन त्यास अटक केली आहे. तसेच, अटक आरोपींचे एक लाख ३० हजार रुपये किंमतीचे दोन महागडे मोबाईल ही जप्त करण्यात आले आहे.

ही कामगिरी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त संदीप कर्णीक, पोलीस उपआयुक्त श्रीनिवास घाडगे, सहा.पोलीस आयुक्त नारायण शिरगावंकर, वपोनि गणेश माने, पोउपनि भैरवनाथ शेळके,पोलीस अंमलदार मच्छिंद्र वाळके, विठ्ठल खेडकर, रमेश मेमाने, कानिफनाथ कारखेले, बाळासाहेब सकटे, प्रतिक लाहीगुडे, ऋषिकेश ताकवणे, सचिन पवार, ऋषिकेश व्यवहारे, ऋषिकेश टिळेकर, शेखर काटे, अश्पाक मुलाणी, ज्योती काळे, सुहास तांबेकर यांच्या पथकाने केली आहे.

बातम्या आणखी आहेत...