आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

पुणे:ज्वेलरने तयार केला 'नेकलेस कम गोल्डन मास्क'; कोरोना काळात मास्क म्हणून तर इतर वेळेस नेकलेस म्हणून करू शकता वापर

पुणे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या सर्वत्र पसरलेल्या कोरोना परिस्थितीत मास्क हा आपल्या आयुष्यातील अत्यंत महत्वाचा भाग बनला आहे. आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे मास्क तुम्ही पाहिले असतील. दरम्यान, काही दिवसांपासून चांदीचा आणि सोन्याचा मास्क बनवण्याचा ट्रेंड सुरू झालाय. यातच आता पुण्यातील एका ज्वेलरने एक अनोखा मास्त तयार केला आहे.

पुण्यातील ज्वेलरने तयार केलेला हा मास्क सोन्याचाच आहे, पण हा मास्क फक्त मास्कच नाही तर नेकलेसही आहे. कोरोना काळात तुम्ही याचा मास्क म्हणून वापर करू शकता आणि जेव्हा आपल्याला मास्कची गरज पडणार नाही तेव्हा हा मास्क तुम्ही नेकलेस म्हणून वापरू शकता.  22 कॅरेट सोन्यामध्ये घडवण्यात आलेल्या नेकलेस कम गोल्डन मास्कचे वजन 124.5 ग्रॅम आहे. हा सोनेरी मास्क लवचिक असून कोणत्याही व्यक्तीला व्यवस्थितपणे परिधान करता येऊ शकतो. हा मास्क बनविण्यासाठी कारागिरांना 2 आठवडे लागले. 

एन-95 मास्कवर स्टिच करुन हा नेकलेस चोकर तयार केला आहे. या मास्कमधून श्‍वास घेता यावा यासाठी सोन्याच्या बारीक जाळ्यांची खास निर्मिती करण्यात आलेली आहे. हा मास्क स्वच्छ करण्यासाठी खास असा युव्ही सॅनिटायझर बॉक्स ग्राहकांना भेट म्हणून दिला जाईल. शिवाय नेकलेस ज्या मास्कवर घडवण्यात आला आहे, तो मास्कही बदलता येऊ शकतो. या सोनेरी मास्कची किंमत तब्बल 6.5 लाख रुपये इतकी आहे.