आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दागिने लंपास:साड्यांच्या माेहापायी महिलांनी गमावले दागिने

पुणे5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आमच्या शेठला फार वर्षांनी लेकरू झाले आहे, ते म्हाताऱ्या बायकांना साड्या, पैसे माेफत वाटणार आहेत, असे आमिष दाखवून ज्येष्ठ नागरिक महिलांना त्यांच्या अंगातील साेने काढून ठेवण्यास सांगून ते हातचलाखीने लंपास करण्याच्या दाेन घटना पुण्यात सिंहगड राेड व चतुशृंगी पाेलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्या आहेत. या घटनेत दाेन ज्येष्ठ नागरिक महिलांचे सव्वादाेन लाख रुपयांचे दागिने लंपास झाल्याची माहिती पाेलिसांनी साेमवारी दिली.

पहिल्या घटनेत सुशीला चनबस वैरागकर (८५, रा. वडगाव, पुणे) या वडगाव परिसरात पाच नाेव्हेंबर राेजी पायी जात असताना त्यांना एका अनाेळखीने थांबवून, माझ्या शेठला फार दिवसांनी लेकरू झाले आहे, ते म्हाताऱ्या बायकांना साड्या व पैसे वाटणार आहेत, असे सांगून त्यांना गाेल्डन बेकरीसमाेर नेले. तेथे त्याच्या दुसऱ्या साथीदाराने त्याच्याकडील लाल रंगाच्या पिशवीतील पैशांचे बंडल दाखवत तुम्ही आपले दागिने यात ठेवा, असे सांगितले. सुशीला वैरागकर यांनी अंगावरील दागिने काढून पिशवीत ठेवल्यानंतर हातचलाखी करत पैशांचे बंडल देत असल्याचे भासवून बिस्किटांचे पुडे असलेली पिशवी त्यांच्या हाती देऊन पैशाचे बंडल असलेली पिशवी व १.९० लाखांचे दागिने लंपास केले.

दुसऱ्या घटनेत पाषाण परिसरातील ७९ वर्षीय ताराबाई दिनकर पंडित या सहा नाेव्हेंबर राेजी राहत्या घराजवळील परिसरातून पायी जात असताना त्यांनाही असेच गंडवले.

बातम्या आणखी आहेत...