आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Jitendra Narayan Alias Wasim Rizvi And Singer Sandeep Acharya Were Targeted On Terrorists' "hitlist" Of BJP Leader's Rallies In Uttar Pradesh.

जितेंद्र नारायण ऊर्फ वसीम रिझवी, गायक संदिप आचार्य होते टार्गेटवर:पुण्यात अटक केलेल्या दहशतवाद्यांचा कट उघड

पुणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
एटीएसकडील दोषारोपपत्रातून माहिती उघड - Divya Marathi
एटीएसकडील दोषारोपपत्रातून माहिती उघड

उत्तर प्रदेश व दिल्लीत घातपाती कारवाया करण्याच्या तयारीत असल्या प्रकरणी दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) दापोडीतून अटक केलेल्या जुनैद आणि त्याच्या साथीदारांकडून धक्कादायक माहिती उघड झाली आहे. त्यांच्याकडून नरसिंहानंदन सरस्वती, गायक संदिप आचार्य, जितेंद्र नारायण ऊर्फ वसीम रिझवी यांच्यावर हल्ला करण्याचे लक्ष्य होते. उत्तर प्रदेशात भाजपच्या रॅलीवर हल्ला करण्याचाही प्लॅन त्यांनी केला असल्याची माहिती उघड झाली आहे.

दोषारोपपत्रामधून माहिती समोर

जम्मू-काश्‍मीरमधील दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याच्या संशयावरून 24 मे रोजी एटीएस'ने जुनैदला दापोडी परिसरातून अटक केली होती. त्यानंतर पथकाने जुनैदचे साथीदार इनामूल हक, युसूफ व आफताब हुसेन शाह यांनाही अटक केली होती. जम्मू काश्‍मीरमधील एका दहशतवादी संघटनेकडून जुनैदला दहशतवादी कारवायांसाठी पैसे पुरविण्यात आल्याचे निष्पन्न झाले होते.

योगी आदित्य नाथ यांचे स्टार प्रचारक गायक संदीप आचार्य टार्गेटवर
योगी आदित्य नाथ यांचे स्टार प्रचारक गायक संदीप आचार्य टार्गेटवर

त्यानंतर पथकाने जम्मू-काश्‍मिरमधून युसूफ व आफताब शाह यांना अटक केली होती. तर इनामूल हकला उत्तरप्रदेशातील सहारनपूरमधून येथून बेड्या ठोकल्या होत्या. जुनैद मुळचा बुलडाणा येथील असून त्याचे दहावीपर्यंत शिक्षण झाले आहे. तो सोशल मीडियाद्वारे जम्मू-कश्‍मीरमधील दहशतवादी संघटनांच्या संपर्कात आला होता.

  • त्यानंतर जुनैद व त्याचे साथीदार दिल्ली व उत्तरप्रदेशामध्ये घातपाती कारवाया करण्याच्या तयारीत असल्याची माहिती पथकाने केलेल्या चौकशीतुन पुढे आली. दरम्यना, "एटीएस'ने शनिवारी न्यायालयात चारही आरोपींविरुद्ध दोन हजार पानांचे दोषारोपपत्र सादर केले होते. त्यामध्ये संबंधित आरोपींनी उत्तर प्रदेश व दिल्ली येथे घातपाती कारवाया करण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते.नरसिंहानंद सरस्वती, गायक संदिप आचार्य व जितेंद्र नारायण ऊर्फ वसीम रिझवी या तीन प्रमुख व्यक्तींवर हल्ले करण्याचा प्लॅन केला होता.

रॅलीवर हल्ला करण्याचा होता प्लॅन

उत्तर प्रदेशमध्ये भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या रॅलीवर जुनैद व त्याच्या साथीदारांन हल्ला करण्याचाही प्लॅन केला होता. त्यासाठी लागणारी स्फोटके बनविण्यासाठीच्या वस्तु व पैसे त्यांना थेट पाकीस्तानातील मिळणार होती. हा सर्व प्लॅन जुनैदच्या देखरेखीखाली सुरु होता, त्याचवेळी "एटीएस'ने त्यास ताब्यात घेतले. दरम्यान, नरसिंहानंद सरस्वती हे गाझियाबादमध्ये "शिव शक्ती धाम'चे महंत आहे. त्यांच्याकडून हिंदू स्वाभिमान नावाची संस्था चालविली जाते. प्रक्षोभक भाषणांवरुन त्यांची ओळख आहे.

कोण आहे जितेंद्र नारायण?

जितेंद्र नारायण उर्फ वसीम रिजवी हे मुळचे उत्तर प्रदेश "शिया वक्‍फ बोर्डा'चे माजी चेअरमन आहेत. त्यांनी काही महिन्यांपूर्वीच सनातन धर्मात प्रवेश केला होता.

तर गायक संदिप आचार्य हे योगी आदित्यनाथ यांचे स्टार प्रचारक होते. वादग्रस्त गाण्यांचे लेखक म्हणूनही ते परिचीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...