आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराझोपडपट्टी सुरक्षा दलाच्या वतीने राज्यपाल हटविण्याच्या मागणीसाठी 'जोडो मारो आंदोलन' विधानभवन ( कौन्सिल हॉल ) या ठिकाणी मोठ्या प्रमाणात करण्यात आले. या प्रसंगी झोपडपट्टी सुरक्षा दलाचे अध्यक्ष भगवानराव वैराट यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विरोधात घोषणा बाजी करून संपूर्ण परिसर दणाणून सोडला. या प्रसंगी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
काय म्हणाले वैराट?
या प्रसंगी बोलताना भगवानराव वैराट म्हणाले की, महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे अराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अनुद्गार काढूनही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी अजुनही आपल्या पदावर चिटकून बसले आहेत. त्यांची त्वरीत हकालपट्टी करण्यात यावी. राज्यपाल पद हे घटनात्मक पद आहे. या पदाचा इतका अपमान महाराष्ट्रात यापूर्वी कोणत्याही राज्यपालाने केला नव्हता. वारंवार आक्षेपार्ह विधाने करुनही कोणतीच कारवाई झालेली नाही, हा एका अर्थाने घटनेचा अपमान आहे. त्यामुळे त्यांचे विरोधात रस्त्यावर उतरुन आक्रमक पवित्रा घेतल्या शिवाय पर्याय उरला नाही.
मोर्चात महिलांसह पुरुषांचा सहभाग
मोर्चात झोपडपट्टी दलाचे शेकडो महिला व पुरुष कार्यकर्ते सहभागी झाले होते. मोर्चाचे संयोजन संघटनेचे पदाधिकारी काशिनाथ गायकवाड, महंमद शेख, सुरेखा भालेराव, वंदना पवार, पल्लवी कंदगल, सुनिल भिसे, हरिभाऊ वाघमारे, दत्ता डाडर, प्रा. सुरेश धिवार, आबा शिंदे, संतोष सोनावणे, शिवाजी भिसे, अरुणा तांगडे, बापू शेंडगे, तानाजी पाथरकर, प्रमिला ठोंबरे, सुनिल पवार, सुहास गलांडे, सूर्यकांत संकपाळ, गणेश लांडगे आदिंनी केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.