आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • 'Join India' For Wider National Interest | It Is The Need Hour To Participate Strongly Against The Destructive Politics Of BJP | Congress Appeals

व्यापक देश हितासाठी ‘भारत जोडो’:भाजपच्या विघातक राजकारणा विरोधात ताकदीने सहभागी होणे काळाची गरज, काँग्रेसचे आवाहन

पुणे21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशाच्या सार्वभौम व व्यापक हितासाठी, सामाजिक सलोखा व सदभावनेच्या वाढीसाठी, लोकशाहीच्या बळकटी साठी “देशातील समस्त नागरिक आणि काँग्रेस जनांनी अर्थातच् पक्षांतर्गत मत-मतांतरे असणारे नेतेगण, समर्थक आदीनी भाजपच्या ‘देश विघातक’ राजकारण विरोधी सर्वांनीच राहुल गांधींच्या नेतृत्वा खालील, सर्वपक्षीय ‘भारत जोडो’ यात्रेत शक्य तेथे किमान अवधीत सहभागी होऊन, विद्यमान सरकार विरोधी ऐक्याचा संदेश देणे, ही काळाची गरज असल्याचे आवाहन काँग्रेस नेते व जेष्ठ प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी रविवारी केले आहे.

संवैधानिक मुल्यांची पायमल्ली

तिवारी म्हणाले, सदर यात्रा काढण्यामागील हेतू हा ‘देशाची सद्य:स्थिती’विषयी जनतेची भावना जाणून घेणे आहे. निव्वळ जाहिरातींद्वारे होत असलेली आभासात्मक दिशाभूल व वास्तवता देशवासियांना अवगत करणे, सत्ताघिशांकडून धर्मांधतेचा होत असलेला विखारी प्रसार, घटनात्मक-संवैधानिक मुल्यांची पायमल्ली, एकाधिकारशाहीकडे वाटचाल, वाढत्या महागाई - बेरोज़गारीची चर्चा संसदेत घडवू न देण्याची सत्तापक्षाची भूमिका, देशाची सार्व. साधन संपत्ती ‘ऊद्योजक मित्रांच्या’ घशात घालण्याचे प्रकार सुरु आहे.

देशव्यापी पदयात्रा

राष्ट्रीय बँकांचे वाढती बुडीत कर्जे, वाढता भूकबळीचा दर, अर्थव्यवस्थेची घसरण व 65 वर्षांच्या तुलनेत मागील वर्षात सुमारे अडीच पटीने देशावर वाढलेले कर्ज सर्व गंभीर बाबींची व देशाच्या ज्वलंत परिस्थिती’ची दखल घेत, पक्ष-हिता पेक्षाही, देशहित लक्षात घेऊन, काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे पुढाकाराने विविध पक्ष, संस्था व विचारांच्या नेत्यांना सोबत घेऊन, 3570 किमी च्या ‘भारत जोडो’ यात्रेत प्रसंगी काँग्रेसचे चिन्ह देखील न वापरता, व्यापक देशहिता करीता व देश वाचवण्या करीता, ‘राष्ट्रीय तिरंगा’ झेंड्याखाली ही देशव्यापी पदयात्रा सुरू झाली आहे.

काँग्रेस नेत्याने अलिप्त राहू नये

विविध स्तरातून या यात्रेस प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. अशावेऴी देश ऊभा करणाऱ्या कुठल्याच काँग्रेस नेत्याने अलिप्त राहू नये हीच् काँग्रेस कार्यकर्त्यांची भावना आहे.ज्या काँग्रेस पक्षाने देशास स्वातंत्र्य मिळवून दिले. तो काँग्रेसचा सच्चा सैनिक अशा निर्णायक वेऴी घरात बसू शकत नाही. त्यामुळे व्यक्तीगत मानपान, निमंत्रण आदी गोष्टीकडे लक्ष न देता. ‘समस्त काँग्रेस जनांनी, संपुर्ण ताकदीने ही यात्रा यशस्वी करणे व सर्व प्रथम ‘देश वाचवणे’ हे प्रत्येक काँग्रेसजनांचे देशाप्रती कर्तव्य ठरेल असे आवाहन जेष्ठ प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...