आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Journalist Pandurang Raykar Dies Due To Lack Of Treatment In Pune, Sister Said Hospitals Worth Crores Were Built But Ambulances Were Not Provided; Ajit Pawar Orders Inquiry

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनाचा बळी:पुण्यात उपचाराअभावी पत्रकाराचा मृत्यू, बहीण म्हणाली - कोटींची रुग्णालये बांधली पण रुग्णवाहिका दिली नाही; अजित पवारांनी दिले चौकशीचे आदेश

पुणे5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • टीव्ही पत्रकार पांडुरंग रायकर यांना 28 ऑगस्ट रोजी कोरोनाची लागण झाली होती

बुधवारी वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे पांडुरंग रायकर (वय 42 वर्षे) या टीव्ही पत्रकाराचा मृत्यू झाला. त्यांना कोरोना झाल्याची 28 ऑगस्ट रोजी पुष्टी झाली होती. यादरम्यान ते अहमदनगर येथे आपल्या घरी होते. श्वास घेण्यास त्रास जाणवल्यानंतर त्यांना पुण्यात आणले. रायकर पुण्यात रुग्णालयात खेटा मारत राहिले, पण त्यांना कुणीही भरती करून घेतले नाही. अखेरीस त्यांना जंबो तात्पुरत्या रुग्णालयात बेड मिळाला. मंगळवारी त्यांची प्रकृती खालावली आणि बुधवारी सकाळी त्यांचे निधन झाले. पांडुरंग रायकर यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.

कार्डियक रुग्णवाहिका न मिळाल्याने भावाचा मृत्यू - रायकरांच्या बहिणीचा आरोप

बुधवारी पांडुरंग यांच्या बहिणीने आरोप केला की, त्यांना कार्डियाक रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे एका सामान्य रुग्णवाहिकेतून पुण्याला आणावे लागले आणि उपचारास उशिर झाला. यासोबतच पत्रकार पांडुरंग रायकर यांना जंबो हॉस्पिटलमध्ये योग्य उपचार मिळाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे बहिणीने सांगितले.

बहिणीने म्हटले की "येथे आराजकता आहे, डॉक्टर देखील प्रशिक्षित नाहीत. सरकारने कोट्यवधी रुपयांची कोव्हिड केंद्रे बांधली. परंतु रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी कार्डियाक रुग्णवाहिकेची व्यवस्था केलेली नव्हती, ज्यामुळे पांडुरंग यांचा मृत्यू झाला."

पत्रकार पांडुरंग रायकर
पत्रकार पांडुरंग रायकर

याप्रकरणी अजित पवार यांनी दिले चौकशीचे आदेश

पांडुरंग रायकर यांच्या निधनानंतर भाजप नेता नितेश राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधत मुख्यमंत्र्यांकडे राजीनाम्याची मागणी केली आहे. याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पांडुरंग यांच्या निधनावर शोक व्यक्त करत याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असल्याचे म्हटले आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही या प्रकरणात कठोर कारवाईची करण्यात येईल असे म्हटले आहे.

नितेश राणे म्हणाले - पुण्यामध्ये पत्रकार रायकर यांचा खुन झाला? महाराष्ट्र शासनाच्या गलथान कारभारामुळे त्यांचा जीव गेला! कोरोना काळात निःस्वार्थी भावनेनी सेवा देणारे पत्रकार देखील सुरक्षित नाहीत! या कोव्हिड सेंटरचे उद्घाटन करणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घ्या. तीच खरी श्रद्धांजली!

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी ट्विटरवर लिहिले - पुण्याचे पत्रकार पांडुरंग रायकर यांचे कोरोनामुळे आपल्यातून अकस्मात निघून जाणे हे मनाला अतिशय वेदना देणारे आहे. माझी भावपूर्ण श्रद्धांजली! कुटुंबीय आणि आप्तस्वकियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser