आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

न्यायाधीशांनी 50 हजार लाच घेतल्याचे प्रकरण:न्यायाधीशांनी 50 हजार लाच घेतल्याचे प्रकरण; न्यायाधीश अर्चना जतकरच देत होत्या जागेच्या वादाबाबतच्या दाव्यांची माहिती गायकवाडला; कोर्टातून मिळाला जामीन

पुणे8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आरोपी व अर्जदारांमध्ये 147 वेळा संभाषण

न्यायालयात सुरू असलेल्या फौजदारी खटल्याचा निकाल बाजूने लावते, असे सांगून एका महिलेच्या माध्यमातून ५० हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी महिला न्यायाधीश अर्चना जतकर यांची सोमवारी जामिनावर सुटका झाली आहे. जतकर या मध्यस्थ महिला शुभावरी गायकवाड हिला त्यांच्या न्यायालयात सुरू असलेल्या जमिनीबाबतच्या दाव्यांची माहिती देत असल्याचे पोलिस तपासातून समोर आले आहे. याबाबत जतकर यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी न्यायालयात सुरू असलेल्या दाव्यांची माहिती महिलेला देवून संबंधित प्रकरणे सेटल करण्याबाबत सांगितल्याचे मान्य केले आहे. संबंधित महिला न्यायाधीशांनी दिलेल्या माहितीवरून पक्षकारांचा शोध घेत व प्रकरण मिटविण्यासाठी त्यांच्याकडून पैसे घेत असल्याचा पोलिसांना संशय आहे.

जतकर आणि आणि लाच स्वीकारणारी महिला शुभावरी भालचंद्र गायकवाड, सुशांत बबन केंजळे आणि भानुदास ऊर्फ अनिल जाधव यांना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. तर अजय गोपीनाथन याचा पोलिस शोध घेत आहेत. पोलिस कोठडीची मुदत संपत असल्याने जतकर यांनी सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. न्यायाधीश जतकर यांनी तक्रारदारांकडून काही रक्कम स्वीकारली आहे काय? याबाबत चौकशी केली असता त्या उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. तसेच त्यांचा दुसरा नंबर असलेला मोबाईल कुठे आहे, याबाबत देणारे स्पष्टीकरण न पटणारे आहे, असे सरकार पक्षातर्फे विलास घोगरे पाटील यांनी न्यायालयास सांगितले.

आरोपी व अर्जदारांमध्ये १४७ वेळा संभाषण
या गुन्ह्यातील आरोपी आणि अर्जदार यांच्यात मोबाइलवरून १४७ वेळा संभाषण झाले आहे. न्यायदंडाधिकारी जतकर यांच्या मोबाइल क्रमांकाचे डीसीआर पोलिसांना मिळाले आहे. न्यायदंडाधिकारी जतकर यांनी गायकवाड यांना ‘तक्रारदार यांच्याविरुद्धच्या प्रकरणामध्ये त्यांच्या बाजूने काम करून देते’, असे म्हणाल्याचे व्हॉइस रेकॉर्ड पोलिसांच्या हाती आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे गायकवाड हिने तपासादरम्यान न्यायाधीश देशमुख आणि अजय गोपीनाथन यांची नावे घेतली आहेत. त्याबाबत देखील पोलिस तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...