आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्यू:दुसऱ्या मजल्यावरून उडी; तृतीयपंथीयाचा मृत्यू

पुणे6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाकड परिसरातील एका हाॅटेलमध्ये नाचताना झालेल्या वादानंतर हाॅटेलच्या बाउन्सर, मॅनेजरकडून मारहाण हाेऊ लागल्याने ती टाळण्यासाठी एका तृतीयपंथीने हाॅटेलच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी वाकड पाेलिस ठाण्यात द बार हिस्ट या हाॅटेलचे मॅनेजर, बाउन्सर यांच्यावर गुन्हा दाखल झाला.

अभय मनाेज गोंडाणे (२१, रा. येरवडा, पुणे) असे मृत तृतीयपंथीचे नाव आहे. याबाबत एका २४ वर्षीय तृतीयपंथीने पाेलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार द बार हिस्ट हाॅटेलचे मॅनेजर गजानन खरात यांच्यासह बाउन्सरवर गुन्हा दाखल झाला. २५ जुलै राेजी पहाटे दाेन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी पाेलिसांकडे तक्रार दाखल केलेला तक्रारदार हा तृतीयपंथी असून त्याचा मित्र अभय हा विमाननगर परिसरात एका खासगी कंपनीत कस्टमर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करत हाेता. मीस्ट आॅर्गनायझेशन या कंपनीकडून एलजीबीटी लाेकांसाठी २५ जुलै राेजी पार्टीचे आयाेजन केले हाेते. पार्टीत मध्यरात्री दीड वाजण्याच्या नाचताना दुसऱ्या एका तृतीयपंथीसाेबत त्यांचे भांडण झाले. त्यातून वाद वाढल्याने घटना घडली.

बातम्या आणखी आहेत...