आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ATS कडून जुनैदची झाडाझडती:'लश्कर'च्या जुनैदची 15 फेसबूक व 7 व्हॉट्सॲप खाती, 11 सिमकार्डही आढळले

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पाक स्थित 'लश्कर ए तोयबा' नामक अतिरेकी संघटनेसोबतच्या कथित संबंधांवरुन ताब्यात घेण्यात आलेला जुनैद महंमद सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असल्याचे उजेडात आले आहे. राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) केलेल्या चौकशीत जुनैदची फेसबूकवर तब्बल 15 तर व्हॉट्सअॅपवर 7 खाती असल्याचे निष्पन्न झाले आहे. एवढेच नव्हे तर तपास यंत्रणेला त्याच्याकडे 11 सिमकार्डही आढळलेत. त्याच्या समाज माध्यमांवरील या चौफेर वावरामुळे सुरक्षा यंत्रणांची काळजी वाढली आहे.

एटीएस करणार तपास

या खात्याची तपासणी आणि फेसबूक खात्याशी जोडले गेलेल्या लोकांचा तपासही एटीएसकडून केला जाणार आहे. फेसबूक खात्यातील फेंड्स कोण आहेत ते कोणत्या विचाराचे आहेत या खात्यातून काही हालचाली केल्या जात होत्या का याचाही तपास केला जाणार आहे.

जुनेदला 7 जून, आफताबला 14 जूनपर्यंत कोठडी

जुनेदचा साथीदार आणि हस्तक म्हणून आरोप केला जाणारा संशयित आफताब हुसैन शाह (वय 28, रा. किश्‍तवार, जम्मू आणि काश्मीर) याला काश्मीर येथे एटीएसने अटक केली. या दोघांना विशेष सत्र न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांच्या न्यायालयात शुक्रवारी हजर करण्यात आले. न्यायालयाने जुनेद याला सात जून तर आफताब यास 14 जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे.

शाह हा जुनेद आणि लष्करे ए- तोयबा यांच्यातील महत्त्वाचा दुवा असल्याचा पोलिसांना संशय आहे. जुनैदला मागच्या महिन्यात अटक केल्यानंतर एटीएसच्या पथकांनी कारगील, गंधरबल, श्रीनगर परिसरातील विविध ठिकाणी स्थानिक पोलिसांच्या समन्वयाने शोध मोहीम राबवली. या तपास पथकाने श्रीनगरपासून 291 किलोमीटर अंतरावर असलेल्या किश्‍तवार या ठिकाणी आफताबला ताब्यात घेतले. आफताबला स्थानिक न्यायालयात हजर केले असता न्यायाल्याने त्यास तीन दिवसांची ट्रान्झिट रिमांड मंजूर करून एटीएसच्या ताब्यात दिले.

बातम्या आणखी आहेत...