आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रतिबंधित लष्कर-ए-तोयबा संघटनेशी संबंध असल्याच्या कारणावरून मोहंमद जुनैद मोहंमद अता(वय २८,रा.गोंधनापूर, ता.खामगाव, जि.बुलडाणा) याला पुणे दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) अटक केली आहे.
दहशतवादी संघटनेकरिता मोठया प्रमाणात तरुणांना भरती करण्यासाठी जुनैद सोशल मिडियाचा वापर करत हाेता असा दावा एटीएसने केला आहे. यासंर्दभात उत्तरप्रदेशातही जुनैद याच्या सोशल मिडिया हालचाली दिसून आल्या आहे. त्या अनुषंगाने मोहंमद जुनैदच्या अटकेनंतर त्याच्या तपासाची माहिती घेण्यासाठी उत्तरप्रदेश एटीएसच्या पथकाने नुकताच पुणे दौरा केला आहे. अधिक तपासाकरिता त्याचा ताबा मिळविण्यासाठी यूपी एटीएस प्रयत्नशील असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
जुनैदची १४ दिवसांची पोलिस कोठडी संपल्यानंतर त्याला मंगळवारी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश अतिरिक्त सत्र न्यायालयाने दिले आहे. या प्रकरणात आरोपी मोहंमद जुनैदच्या चौकशीत पोलिसांनी जम्मू काश्मीर मधील पलमार किश्तवाड येथून सुतारकाम करणारा आणि लष्कर ए तोयबाचा हस्तक आफताब हुसेन अब्दुल जब्बार शाह (२८) यालाही दाेन जून रोजी अटक केली. तो १४ जूनपर्यंत पोलिस कोठडीत आहे.
जुनैदच्या संपर्कातील उमर पाकिस्तानात पळाला
जुनैद हा जम्मू-काश्मीर मधील लष्कर ए तोयबाच्या सक्रिय सदस्यांच्या ‘अन्सार गझावत हिंत-त्वाहिद’ या व्हाटसअप ग्रुपमध्ये सहभागी झाला हाेता. यात राष्ट्र विरोधी पोस्ट टाकून इतर सदस्यांना उत्तेजीत करत होता. आतापर्यंत जुनेदची एकूण १५ फेसबुक खाती, सात व्हाॅटसअप खाती व ११ सिमकार्ड मिळून आली आहे. जुनैदच्या संर्पकात जम्मू-काश्मीर मधील उमर नावाचा व्यक्ती पाकिस्तान पळून गेला असल्याचे तपास यंत्रणाच्या चौकशीत निष्पन्न झाले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.