आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुण्यातील जुन्नर तालुक्यातील बगाड यात्रेत भीषण अपघात झाला आहे. यात्रा सुरू असतानाच बगाड मधोमध तुटल्याने बगाडला लटकलेले दोघे खाली कोसळले. दोघेही मानकरी जवळपास 8 ते 10 फुटांवरुन खाली कोसळले.
यातील एक जण गंभीर जखमी झाला आहे. तर, एक जण किरकोळ जखमी झाला आहे. ग्रामस्थांनी या जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे.
जुन्नर तालुक्यातील पारुंडे येथील ब्रम्हनाथ जत्रेत बगाड यात्रा भरली आहे. यात्रा उत्साहात सुरु असतानाच हा अपघात झाला. यामुळे यात्रेत सहभागी झालेल्या सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला. या अपघाताचा थरार कॅमेऱ्यातही कैद झाला आहे.
नेमके काय घडले?
जुन्नर तालुक्यातील पारुंडे येथे बगाड यात्रा सुरु होती. बगाड म्हणजे एका खांब आडवा करुन त्याला उंचावर नेले जाते व दोन्ही बाजूने लोखंडी आकड्याने एक-एक जणाला लटकावून माणसांची मिरवणूक काढली जाते. ज्याला नवस फेडायचा आहे किंवा त्याच्या वतीने दुसरा कुणीतरी या बगाडवर स्वार होऊ शकतो. पारुंडेतही हा कार्यक्रम सुरु होता. मात्र, यात्रा सुरु असतानाच बगाड मधोमध तुटला. या दुर्घटनेत दोन्ही बाजूचे तरुण उंचावरून खाली पडले व जखमी झाले. सुनील चिलप आणि संदीप चिलप बगाड हे दोघे या बगाडाला लटकलेले होते.
एक गंभीर, तर एक किरकोळ जखमी
या घटनेमुळे यात्रेतील सर्वच ग्रामस्थांची धावपळ उडाली. ग्रामस्थांनी लागलीच धाव घेत जखमी सुनील व संदीप यांना रुग्णालयात नेले. या घटनेत एक जण गंभीर जखमी तर दुसरा किरकोळ जखमी आहे. बगाड मध्यभागी तुटल्याने हा अपघात झाला. दरम्यान, कोरोनाच्या दोन वर्षांच्या कालावधीनंतर यंदा राज्यभरात सर्वत्र मोठ्या उत्साहात यात्रा भरत आहेत. त्यामुळे शहरातील अनेक नागरिक गावाकडे धाव घेत आहेत.
संबंधित वृत्त
म्हातोबाच्या नावानं चांगभलं:हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर हिंजवडी आयटी पार्कमधून निघणार बगाड मिरवणूक, 388 वर्षांची परंपरा
हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर हिंजवडी आयटीपार्कमधून श्री म्हातोबा देवाची बगाड मिरवणूक आज दुपारी चार वाजता सुरू होणार आहे. 1635 पासून ही बगाड मिरवूणक निघते. कोरोना काळ वगळता गेली 388 वर्ष ही परंपरा कायम आहे. म्हातोबा देवाची गावजत्रा आजपासून हिंजवडीसह वाकड गावात सुरू होत आहे. त्यानिमित्त ही बगाड मिरवणूक काढली जाते. श्री म्हातोबा देवाचे अस्तित्व वाकड हिंजवडी या दोन्ही गावात असल्याने दोन्ही गाव मोठ्या श्रद्धेने उत्सव साजरा करतात. बगाडाची उभारणी करण्याच्या मान वाकड- हिंजवडी गावातील सुतार कारागिराचा असतो. पारंपारिक पद्धतीने सुतार व ग्रामस्थांच्या मदतीने बगाडाची उभारणी करण्यात येते. वाचा सविस्तर
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.