आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोयत्याच्या धाकाने नाना पेठ परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणार्या आणखी दोघांना युनीट एकने अटक केली आहे. त्यांच्याकडून कोयता, पालघन, सुरा असा शस्त्रसाठा जप्त केला आहे. याआधी पाचजणांच्या सराईत टोळीला समर्थ पोलिसांनी अटक केली आहे अशी माहिती पोलिसांनी बुधवारी दिली आहे. ही घटना नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सकाळी सहाच्या सुमारास नवावाडा परिसरात घडली होती.
मयुर दत्तात्रय थोरात (वय- २३ रा. नानापेठ,पुणे), आणि सुजल राजेश टापरे( वय १९, रा. नानापेठ,पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. यापुर्वी गगन मिशन (रा. नानापेठ), अमन युसूफ खान (रा. नानापेठ), अरसलन तांबोळी (रा. रविवार पेठ), मंगेश कैलास चव्हाण (रा. रविवार पेठ), गणेश प्रकाश पवार (रा. रविवार पेठ) यांना पोलिसांनी अटक केली आहे.
दहशत निर्माण करण्यासाठी सराईत टोळीने हातात कोयते आणि सुरा घेउन नानापेठेतील नवावाडा परिसरात राडा घातला होता. कोयते नाचवित आरडाओरड करून नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली होती. याप्रकरणी गुन्ह्याचा समांतर तपास युनीट एक करीत होते. कोयता गँगमधील दोघे आरोपी नारायण पेठेतील मंदीरालगत लपल्याची माहिती पोलिस अमलदार अजय थोरात आणि निलेश साबळे यांना मिळाली.
पथकाने सापळा रचून मयूर आणि सुजल याच्यासह अल्पवयीनाला ताब्यात घेतले. ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहआयुक्त संदीप कर्णिक, अपर आयुक्त रामनाथ पोकळे , उपायुक्त अमोल झेंडे, एसीपी गजानन टोम्पे, पोलीस निरीक्षक संदीप भोसले, उपनिरीक्षक सुनिल कुलकर्णी, पोलीस अंमलदार अजय थोरात, निलेश साबळे, दत्ता सोनवणे, विठ्ठल साळुंखे, तुषार माळवदकर, रूक्साना नदाफ यांनी केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.