आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यातील शेतकरी अवस्था पाहून आम्ही पंढरपूरच्या विठ्ठलास साकडे घालणार आहे, असे म्हणत सत्ताधाऱ्यांनी राज्यातील देवांनाही जात जावे असा टोलाही त्यांनी सरकारला लगावला.
आज प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी कामाख्या, आयोध्या, रामेश्वर मंदिराच्या दर्शनासाठी जाऊन आलेल्या सरकारवर टीका केली.
काय म्हणाले जयंत पाटील?
जयंत पाटील म्हणाले , मंत्रिमंडळ आयोध्येस गेले होते तेंव्हा आम्ही बांधावर अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देत हेातो. सत्ताधारी आता कामाख्या मंदिर, रमेश्र्वर मंदिरात दर्शनाला जातील. मात्र, राज्यातील देवांनाही त्यांनी जात जावे, असा टोलाही त्यांनी सरकारला लगावला.
महाराष्ट्रात अनेक प्रश्न महत्वाचे आहे. सावरकर गौरव दिन सारख्या घोषणा सत्ताधारी यांनी करण्यापेक्षा सर्वसामान्य लोकांना नेमक्या काय अडचणीना सामोरे जावे लागते ते पाहिले जावे. राज्यातील शेतकरी अवस्था पाहून आम्ही पंढरपूरच्या विठ्ठलास साकडे घालणार आहे असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
अदानीवरून धुसफूस नाही
महाविकास आघाडी मध्ये उद्योजक गौतम अदानी विषयावरून कोणतीही धुसफूस नाही. जेष्ठ नेते शरद पवार यांनी त्यांची भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. सर्वच्च न्यायालायच्या चौकशीसाठी त्यांनी विरोध केला नाही. तर संसदेच्या जेपीसी समिती चौकशी उपयोगी पडणार नाही असे सांगितले आहे असे मत पाटील यांनी व्यक्त केले.
जगतापांच्या उमेदवारीसाठी प्रयत्न
पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस लोकसभेला इच्छुकपुणे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप हे सर्व संघटना सोबत घेऊन काम करत आहे. त्यांना उमेदवारी मिळावी अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. ही निवडणूक होणार असेल तर ती जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावी आमची ईच्छा आहे. दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर भाजपने लगेच बॅनरबाजीला सुरू केली. अनेक जणांनी मला जगताप यांना उमेदवारी मिळावी यासाठी फोन करून प्रयत्न सुरू केले आहे अशी माहिती पाटील यांनी दिली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.