आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसंग्रामच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी ज्योती मेटे:स्वर्गीय मेटे साहेबांची सावली आता शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांची होणार माऊली

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

​​डॉ.ज्योती विनायकराव मेटे यांची शिवसंग्रामच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. शिवसंग्राम राज्य कार्यकारिणीची बैठक पुणे येथे प्रदेशाध्यक्ष तानाजीराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला.

शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष स्व.विनायकराव मेटे यांच्या निधनानंतर संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा त्यांच्या पत्नी डॉ.ज्योती मेटे यांनी स्वीकारावी. भाजपचा मित्रपक्ष या नात्याने आपली चोख कामगिरी बजावणाऱ्या शिवसंग्रामला न्याय देत भाजपने राज्यपाल नामनिर्देशित विधान परिषद सदस्यपदी डॉ.ज्योती मेटे यांची शिफारस करावी. तसेच आगामी मंत्रिमंडळ विस्तारात डॉ.ज्योती मेटे यांना स्थान द्यावे,अशा स्वरूपाचे ठराव शिवसंग्रामचे प्रदेशाध्यक्ष तानाजीराव शिंदे यांनी पुणे येथील शिवसंग्रामच्या राज्यस्तरीय कार्यकारणी बैठकीदरम्यान एकमताने मंजूर करण्यात आल्याचे जाहीर केले. या बैठकीला राज्यभरातून शिवसंग्रामचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष स्व.विनायकरावजी मेटे यांचे अपघाती निधन झाल्यानंतर शिवसंग्रामची धुरा कोण सांभाळणार ? शिवसंग्रामच्या भवितव्याचे काय ? अशा सर्व प्रश्नावर आज शिवसंग्रामच्या कार्यकारणी बैठकीमध्ये पडदा पडला. शिवसंग्रामच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी स्व. विनायकराव मेटे यांच्या पत्नी डॉ. ज्योती मेटे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. या बैठकीसाठी राज्यभरातून विविध पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. प्रत्येकाने साहेबांनी दिलेला संघर्षाचा वासा व विचारांचा वारसा सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी संघटनेशी बांधील आहोत, असे स्पष्ट मत व्यक्त केले. तसेच शिवसंग्राम संघटनेच्या स्थापनेपासून आम्ही स्व. साहेबांच्या खांद्याला खांदा लावून काम केलेलं आहे. त्यामुळे उर्वरित आयुष्य विविध सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी जबाबदारीने काम करणार असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी दिला.

डॉ.ज्योती मेटेनी आपल्या भाषणामध्ये आयुष्याच्या अवघड वळणावरती आपण सर्वजण उभे आहोत. परंतु आता आसवांना बांध घालून आपणांसर्वांना एकजुटीने पुढे जायचे आहे. वीस-बावीस वर्षांपासून शिवसंग्राम संघटनेत आपण सर्वजण काम करत आहात. ही संघटना वाढवण्यासाठी आपणा सर्वांचे या खूप मोठे योगदान आहे. शिवसंग्राम स्थापनेचा मूळ उद्देश तडीस नेला जाईल. सामाजिक समस्या जसे की मराठा आरक्षण, अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक तसेच विविध जाती -धर्मातील आरक्षण तथा उपेक्षित असणारे सर्व प्रश्न आपण संघटित होऊन यासाठी मोठा लढा उभा करून ते भविष्यात सोडवणार आहोत. तसेच शिवसंग्राम संघटनेची ही मोठी इमारत बेवारस सोडली जाणार नाही. शिवसंग्राम संघटना टिकवणार-वाढवणार यात तीळ मात्र शंका नाही.

संघर्षाचा वारसा

याप्रसंगी स्वर्गीय मेटे साहेबांची आठवण करत त्यांनी सांगितले की, जेव्हा बीड जिल्ह्यातील शिरूर कासार येथे मुलींचे प्रमाण कमी झाले होते तेव्हा स्व. विनायकराव मेटे साहेबांनी अजित बालिका योजना सुरू केली व मुलीच्या जन्म झाल्यास तिच्या नावे एफ.डी केली जात होती. त्यामुळे या शिरूर कासार तालुक्यातील मुलीचा जन्मदर वाढला व येथील मोठी लिंग -गुणोत्तराची समस्या सोडवली गेली. याच पद्धतीने विविध अडथळ्यांची शर्यत पार करून साहेबांनी दिलेला संघर्षाचा वारसा हा नेटाने व एकजुटीने पुढे घेऊन आपण सर्वजण जाणार आहोत. आणि शिवसंग्रामच्या कार्याचा गौरवाचा दिवस खूपच जवळ आहे. स्वर्गीय विनायकरावजी मेटे साहेबांचे अधुरे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी शेवटच्या श्वासापर्यंत शिवसंग्राम संघटना सर्व पदाधिकारी ,मावळे, गोरगरीब, वंचित, उपेक्षित समाज यांच्या सोबत आहे, असा ठाम विश्वास डॉ. ज्योती मेटे यांनी यावेळी व्यक्त केला.

बातम्या आणखी आहेत...