आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासध्याचा कालखंड असा आहे की आपल्या मुलांना शेक्सपिअरचे साहित्य माहीत असते. पण, महाकवी कालिदासाच्या साहित्यापासून ते दूर असतात. शेक्सपिअरबरोबरच कालिदासाचाही अभ्यास करायला हवा. संस्कृतीचे मूळ घट्ट असेल तरच फळाची प्राप्ती होत असते. संस्कृत आणि मातृभाषा हे मूळ घट्ट असेल तर संस्कृतीच्या अभ्यासातून फलप्राप्ती होऊ शकेल, असे मत ज्येष्ठ लेखिका सुधा मूर्ती यांनी शनिवारी व्यक्त केले.
भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेमध्ये मूर्ती फाउंडेशनच्या अर्थसाह्यातून संशोधकांसाठी नव्याने साकारण्यात येत असलेल्या ‘मूर्ती सेंटर ऑफ इंडिक स्टडीज’ या वास्तूचे भूमिपूजन सुधा मूर्ती यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी मूर्ती बोलत होत्या. संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ उद्योगपती अभय फिरोदिया कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.शहर अभियंता प्रशांत वाघमारे, संस्थेचे मानद सचिव डाॅ. सुधीर वैशंपायन, कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष भूपाल पटवर्धन, ॲड. सदानंद उर्फ नंदू फडके आणि डॉ. प्रदीप आपटे या वेळी उपस्थित होते.
शिक्षकाची मुलगी असल्याने ज्ञान हे संपत्तीपेक्षाही मौल्यवान आहे हा संस्कार माझ्यावर झाला आहे, असे सांगूून मूर्ती म्हणाल्या, माझे आजोबा डेक्कन कॉलेजचे विद्यार्थी होते. वडिलांनी बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयामध्ये शिक्षण घेतले होते. ज्ञानाचे भांडार असलेली भांडारकर संस्था खूप चांगले काम करत आहे. पण, प्रसिद्धीअभावी हे काम समाजापर्यंत पोहीचत नाही. त्यामुळे संस्थेच्या विविध शैक्षणिक उपक्रमांसाठी आणि पायाभूत सुविधांच्या पूर्ततेसाठी निधी मिळत नाही हे वास्तव नाकारता येणार नाही. आठवडाभर पंचतारांकित भोजन करून कंटाळा येऊ शकतो. अशा वेळी पिठलं- भाकरी महत्त्वाची ठरते. लोकांना मदत करण्यात मला आनंद मिळतो. मूळ घट्ट नसेल तर फळ मिळत नाही. संस्कृती आणि भाषा यांचा परस्पर संबंध आहे. भाषा टिकली तरच संस्कृती विकसित होईल. फिरोदिया म्हणाले, संस्थेकडे असलेले ज्ञानभांडार तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी आधुनिक माध्यमांचा वापर केला जात आहे, ही चांगली बाब असल्याचे ते म्हणाले.
कोणताही पक्ष सत्तेवर असो, सरकार विक्षिप्तच असते. कोणताही पक्ष सत्तेवर असो, सरकार विक्षिप्तच असते. ते व्यावहारिक आणि सांस्कृतिक विचार करत नाही. आपण हत्तीकडून उडण्याची अपेक्षा करतो का? तसे सरकारचे आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठावर सरकार किती खर्च करते. तो योग्य आहे, नाही यावर चर्चा करण्यात अर्थ नाही. पण, ज्ञानाचा अमूल्य ठेवा जतन करणाऱ्या भांडारकर संस्थेलाही सरकारने अर्थसाह्य करावे. - अभय फिरोदिया, ज्येष्ठ उद्योजक
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.