आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहायप्रोफाइल सेक्स रॅकेट चालवत संघटित गुन्हेगारी करणाऱ्या कुख्यात कल्याणी देशपांडे व तिचा सहकारी प्रदीप गवळी याला विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी ७ वर्षे सक्तमजुरी आणि १० लाख रुपये दंडाची शिक्षा सोमवारी सुनावली आहे. दंडाची रक्कम न भरल्यास अतिरिक्त १ वर्षे कारावास भोगावा लागले असे आदेशात नमूद केले आहे. आरोपी कल्याणी देशपांडे हिला पिटा आणि मोक्का गुन्ह्यात राज्यात प्रथमच अशाप्रकारे शिक्षा झाली आहे.
पुण्यातील कोथरूड भागातील एका सोसायटीमध्ये हायप्रोफाइल सेक्स रॅकेट चालवल्याप्रकरणी कल्याणी देशपांडे हिला ऑगस्ट २०१६ मध्ये अटक केली होती. शहरात संघटितपणे वेश्याव्यवसाय केल्याप्रकरणी कल्याणी देशपांडेवर संघटित गुन्हेगारी कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणी कल्याणी देशपांडे हिच्यावर चतुःशृंगी, कोथरूड, विश्रांतवाडी, हिंजवडी आदी पोलीस ठाण्यात २० पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत.
या प्रकरणी सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील विजय फरगडे यांनी काम पाहिले. गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी अॅड. फरगडे यांनी युक्तिवादादरम्यान केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.