आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पंढरपूर:विठुमाऊलीची सेवा करणाऱ्या दाम्पत्याला मिळाला कार्तिक एकादशीच्या महापूजेचा मान, 10 वर्षांपासून मंदिरात करत आहेत सेवा

पंढरपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शासकीय महापूजा केली जाणार आहे.

विठ्ठल मंदिरात गेल्या 10 वर्षांपासून विणेकरी म्हणून पहारा देणारे कवडुजी नारायण भोयर (वय- 64 ) व त्यांच्या पत्नी कुसुमबाई भोयर (वय-55) या दाम्पत्याला कार्तिकी एकादशीच्या महापूजा करण्याचा मान मिळाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शासकीय महापूजा केली जाणार आहे. शासकीय महापूजे वेळी वारकरी प्रतिनिधी म्हणून भोयर दाम्पत्य उपस्थित राहणार आहे.

नारायण भोयर हे विठ्ठल रूक्मिणी मंदिरात 24 तास पहारा देतात. विठ्ठल मंदिरातील एकूण सहा वीणेकऱ्यांमधून चिठ्ठी टाकून ही निवड आज करण्यात आली. भोयर दाम्पत्य हे मूळचे वर्धा जिल्ह्यातील आहेत. ते मागील 9 ते 10 वर्षापासून मंदिरात विणा वाजवून पहारा देत आहे. ते स्वतः व त्यांचे कुटुंबिय देखील माळकरी आहेत. मागील 8 महिन्यांपासून लाॅकडाऊन असताना देखील पूर्णवेळ ते मंदिरात सेवा करत आहेत.

दरवर्षी शासकीय महापूजेवेळी मानाचा वारकरी श्रीच्या दर्शनरांगेतून निवडला जातो व त्यांना शासकीय महापूजेची संधी दिली जाते. मात्र कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता, यावर्षी कार्तिकी यात्रा मर्यादित व प्रतिकात्मक स्वरूपात साजरी करण्यात येत आहे. त्यामुळे विठ्ठल रूक्मिणी मंदिरात 24 तास पहारा देणारे विणेकरी यांची मा.उपमुख्यमंत्री महोदयांच्या शुभहस्ते होणा-या शासकीय महापूजेसाठी मानाचा वारकरी म्हणून निवड करण्याचा मंदिर समितीने निर्णय घेतला होता.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser