आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआमदार मुक्ता टिळकांच्या निधनाने रिक्त झालेल्या कसबा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत पक्षाने त्यांचे पती किंवा पुत्रास डावलून हेमंत रासने यांना उमेदवारी दिली. त्यामुळे टिळक कुटुंबीय तर नाराज झालेच, पण ४० वर्षांपासून या मतदारसंघात सातत्याने ब्राह्मण समाजाचा आमदार निवडून देणाऱ्या समाजातून संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे भाजपविरोधात पुण्यात फलक झळकले आहे. इतकेच नव्हे तर ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष अनिल दवे यांनी भाजपविरोधात निवडणूक लढवण्याची घोषणाही केली आहे.
मेधा कुलकर्णींना डावलल्यापासून खदखद वाढली
भाजपने २०१९ मध्ये कोथरूडच्या आमदार मेधा कुलकर्णी यांचे तिकीट कापून चंद्रकांत पाटलांना उमेदवारी दिली. त्या वेळी मेधा यांना पुनर्वसनाचे आश्वासन दिले होते, तेही पक्षाने पाळले नाही. तिथे पाटील विजयी झाले पण त्यांचे मताधिक्य निम्म्याने घटले. आता कसब्यातही इतरांना तिकीट दिल्यामुळे फटका बसेल, असा सूर व्यक्त होत आहे.
शनिवारवाड्याजवळ असे फलक लावले आहेत, त्यावर कुणाचे नाव नाही.
पोटनिवडणुकीत टिळकांना डावलल्याचा राग व्यक्त करण्यासाठी पुण्यात जागोजागी लागले फलक
१३ ते १५ टक्के एकगठ्ठा मतांमुळे ब्राह्मण निर्णायक
१९९२ चा अपवाद वगळता कसबा मतदारसंघात आतापर्यंत ब्राह्मण समाजाचाच आमदार.
इथे ओबीसींची ३० टक्के, मराठा- २३ टक्के, ब्राह्मण १३ ते १५ टक्के, अल्पसंख्याक व मागासवर्गीय समाजाचाही प्रत्येकी १० टक्के मते. मात्र यापैकी फक्त ब्राह्मणांचीच मते एकगठ्ठा समाजाच्या उमेदवारास पडतात. ज्याचा आजवर भाजपला सर्वाधिक लाभ झालेला आहे.
म्हणूनच या जागेवर ब्राह्मणच उमेदवार द्यावा, अशी आग्रही मागणी या समाजातून होत आहे
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.