आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकसबा निवडणुकीच्या निकालाच्या परिणामात भाजप विराेधात वातावरण गेल्याचे दिसून येत आहे. कारण, शिवसेना व भाजप यांच्यातील वादाचा परिणाम मतदारांवर झाल्याचे दिसून येते. पूर्वी उद्धव ठाकरे गटातील लाेक भाजपला विराेध करत नव्हते, परंतु सध्या ते खूप विराेधात गेले आहे. दुसऱ्या बाजूला सत्तातरानंतर मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान झाले नाही, त्यांनी राजकीय टाेकला जाऊन शिवसेना फाेडल्याची भावना असल्याने राज्यातील मध्यमवर्ग भाजपकडून दुरावला गेला आहे असे मत राजकीय विश्लेषक प्रकाश पवार यांनी ‘दिव्य मराठी’शी बाेलताना व्यक्त केले आहे.
शहांविरोधात आधीपासूनच विरोधी जनमत
पवार म्हणाले, राज्यातील मतदारांचे जनमत हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी वगळता भाजपवर घसरल्याचे राज्यात दिसून येत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राजकीय चक्रव्यूहातून व्यक्तिगत सुटू शकतात, परंतु भाजप या चक्रात अडकला गेला आहे. राज्यात पहिल्यापासून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे विराेधात जनमत आहे. परंतु पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्याबाबत हे दिसून येत नाही.
पोटनिवडणुकीचा आगामी निवडणुकीवर परिणाम नाही
पवार म्हणाले, पक्षाला वाचविण्यासाठी एखाद्याचे नावावर खापर फाेडून बाजूला केले जाते. त्याप्रमाणे शाह यांचे नावाने राज्यातील पराभवाचे खापर फुटण्याची शक्यता आहे. भाजप या परिस्थितीत एखाद्या अपयशात अडकून न पडता आगामी काळात विजयाकडे वाटचाल करण्यासाठी प्रयत्नशील राहील. प्रत्येक निवडणुक वेगळी असते त्यामुळे पाेटनिवडणुकीचा फारसा परिणाम आगामी निवडणुकीत हाेणार नाही.
स्थानिक निवडणूक स्थानिक पातळीवरच
पवार म्हणाले, विधानसभा, लाेकसभा, स्थानिक स्वराज्य संस्था या निवडणुका वेगळ्या मुद्दयावर लढल्या जातात. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक ही स्थानिक पातळीवर व्यक्ती पाहून लढली जाते. नगरसेवक कधी निवडून आल्यावर झाेकून देऊन काम करत नाही असे आज पर्यंतचे चित्र पाहवयास मिळते.
जनमत जाती - धर्माशी जोडण्यात तथ्य नाही
पवार म्हणाले, विधानसभा, लाेकसभा तिकिट मिळण्यासाठी तुम्ही काेणत्या गटात आहे, वरिष्ठांचा किती मर्जी आहे. आर्थिक दृष्टया किती सक्षम अशाप्रकारे निकष पक्षांकडून लावले जातात. जनमत हे सतत बदलत असते त्यामुळे कसबात आगामी निवडणुकीत भाजपने वेगळा उमेदवार उभा केला तर निकाल पुन्हा बदलण्याची शक्यता आहे. सध्याच्या काळात लाेक जातीधर्मावर मते देत नाही.त्यामुळे जनमत विराेधात गेले की त्यास जाती धर्माशी जाेडण्यात तथ्य नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.