आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कसबात 'मविआ'चा विजय:28 वर्षानंतर मतदारसंघात परिर्वतन; चिंचवडला भाजपचा गड कायम, कलाटेंमुळे नाना काटेंच्या मार्गात काॅंटे

पुणे24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या कसबा मतदारसंघ तब्बल 28 वर्षानंतर भारतीय जनता पक्षाकडून स्वत:कडे खेचण्यात काँग्रेस पक्षासहित महाविकास आघाडी यशस्वी ठरली आहे. काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी पहिल्या फेरीपासून मतमाेजणीत आघाडी घेऊन 20 व्या फेरीअखेर 10 हजार 688 मतांनी विजय झाला आहे. तर, चिंचवड मतदारसंघात भाजपने आपला गड कायम राखत दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांची पत्नी अश्विनी जगताप यांनी माेठ्या फरकाने विजय संपादित केला आहे.

पहिल्या फेरीपासून भाजपमध्ये अस्वस्थता

कसबा मतदारसंघाची मतमाेजणी काेरेगाव पार्क येथे पार पडली. पाेस्टल मतदानासह पहिल्या फेरीपासून अखेरच्या फेरीपर्यंत धंगेकर यांनी माेठी आघाडी प्राप्त केल्याने भाजपच्या गटात अस्वस्थता पसरलेली हाेती. ज्याप्रकारे विजयाकडे त्यांची वाटचाल सुरु झाली तशी कार्यकर्त्यांनी जल्लाेषाची तयार करत आनंद व्यक्त केला.

बिचकुले, दवेंचे डिपाॅझीट जप्त

कसबात एकूण दाेन लाख 75 हजार 679 एकूण मतदान असून त्यापैकी एक लाख 38 हजार 403 मतदारांनी नाेंदवलेली मते मतदान प्रक्रियेत पात्र ठरलेली हाेती. या निवडणुकीत धंगेकर यांना एकूण 73 हजार 194 मते पडली तर भाजपच्या हेमंत रासने यांना 62 हजार 244 मते प्राप्त झाली. ब्राम्हण महासंघाचे आनंद दवे यांनी 296 मते मिळवत ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले तर अपक्ष उमेदवार अभिजित बिचकुले यांना 47 मते प्राप्त झाले. दवे आणि बिचकुले या दाेघांचे निवडणुक डिपाॅझीट जप्त झाले आहे.

'नोटा'ला 397 मते

या मतदारसंघात एक हजार ३९७ मतदारांनी ‘नाेटा’ मतदानास पसंती दिलेली आहे. काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांचा विजय निश्चित झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत, घाेषणाबाजी करुन आनंद व्यक्त करत विजयी रॅली काढली.

कलाटेंमुळे नाना काटेंच्या मार्गात काॅंटे

चिंचवड मतदारसंघात भाजपच्या अश्विनी जगताप यांनी ही निवडणुक मतमाेजणीत सुरुवातीपासून आघाडी घेतल्याचे पहावयास मिळाले. शिवसेनेचे बंडखाेर राहूल कलाटे यांच्या उमेदवारीमुळे महाविकास आघाडीचे अधिकत उमेदवार नाना काटे यांना या निवडणुकीत फटका बसल्याचे निवडणुकीचे निकालात दिसून आले आहे.

अश्विनी जगताप यांचे पारडे जड

या मतदारसंघात भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी केलेली विकासकामे व त्यांच्या निधनानंतरची सहानभूती यामुळे अश्विनी जगताप यांचे विजयाचे पारडे जड झाले. एकूण 36 फेरीच्या निकालात जगताप यांनी माेठया मताधिक्क्याने विजयाकडे घाैडदाैड केल्याने 32 व्या फेरी अखेर त्यांना 33 हजार 714 ची आघाडी मिळाले.

अश्विनी जगताप यांची भावना

''साहेबांच्या (लक्ष्मण जगताप) यांच्या प्रेमापाेटी मला माेठ्या प्रमाणात मतदान मिळाले.‘ नाते जिव्हाळयाचे, कार्य समृध्दीचे’ हे वाक्य त्यांचे प्रसिद्ध हाेते आणि सर्वांचे काम ते करत हाेते. त्यामुळे मला मतदारांनी भरभरुन मते दिलेली आहे.'' अशी भावना अश्विनी जगताप यांनी व्यक्त केली आहे.

बातम्या आणखी आहेत...