आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामागील काही दिवसांपासून राज्यभरात चर्चेचा विषय असलेल्या कसबा पेठ मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. पोटनिवडणुकीत कोण विजयी होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. मतमोजणी कोरेगाव पार्क येथील भारतीय खाद्य निगम गोदामात होत असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पुणे पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहरातील मध्यभागातही कडक बंदोबस्त तैनात केला आहे. निकालानंतर विजयी उमेदवारांना विजयी मिरवणूक काढण्यास देखील पोलिसांनी मनाई केली आहे.
निकालानंतर संभाव्य अनुचित घटना आणि कार्यकर्त्यांमधील वाद टाळण्यासाठी पोलिसांकडून मतमोजणीच्या ठिकाणी तसेच शहराच्या मध्यभागातील कसबा पेठ, सोमवार पेठ, मंगळवार पेठ, रास्ता पेठ,नाना पेठ, रविवार पेठ, बुधवार पेठ, शुक्रवार पेठ, घोरपडे पेठ, लोहियानगर, काशेवाडी भागात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याशिवाय कोरेगाव पार्क येथील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. तर, विशेष शाखा तसेच गुन्हे शाखेतील पोलिसांची पथके शहराच्या मध्यभागात गुरुवारी दिवसभर गस्त घालणार आहेत. भाजप आणि महविकास आघाडी उमेदवारांच्या कार्यालय परिसरातही पोलिसांनी विशेष लक्ष देत पुरेशी सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे.
सोशल मीडियावर पोलिसांचे लक्ष
कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी उपाय म्हणून समाजमाध्यमांवर देखील पोलिसांचे लक्ष राहणार आहे. गैरप्रकार तसेच आक्षेपार्ह संदेश प्रसारित केल्यास कारवाई करण्याचा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे. तसेच, शहरातील संवेदनशील ठिकाणी पोलिसांचे लक्ष राहणार आहे. निकालापूर्वी सर्वपक्षीय कार्य़कर्त्यांची बैठक आयोजित केली असून कायदा व सुव्यवस्थेचे पालन करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. त्यामुळे अनुचित प्रकार करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश पोलिसांकडून देण्यात आलेले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.