आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोबाइल नंबरवरून फसवणुक:पूनावालांच्या नावे बनावट संदेश पाठवत काेटीचा गंडा

पुणे16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगभरात काेविशील्ड या काेराेना लसीचा पुरवठा करणारे पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख अदर पूनावाला यांच्या मोबाइल नंबरवरून बनावट व्हाॅट्सअॅप मेसेज पाठवून विविध खात्यांत पैसे पाठवण्यास सांगून तब्बल १ काेटी १ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणी बंडगार्डन पाेलिस ठाण्यात आयपीसी ४११९, ४२०, ३४ सह आयटी अॅक्ट ६६ सी व डी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी सिरम कंपनीचे फायनान्स मॅनेजर सागर कित्तूर यांनी बंडगार्डन पाेलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. हा सर्व फसवणुकीचा प्रकार ७ व ८ सप्टेंबरदरम्यान ऑनलाइन पद्धतीने घडला आहे. अदर पूनावला यांच्यासोबत संचालक म्हणून सतीश देशपांडे हे काम करतात. देशपांडे यांच्या माेबाइलवर कंपनीचे सीईओ अदर पूनावाला यांच्या माेबाइल क्रमांकावरून व्हाॅट्सअॅप मेसेज आला. त्या मेसेजमध्ये काही बँक खात्यांचे नंबर देण्यात आलेले हाेते. या नंबरवर तत्काळ पैसे पाठवण्यास सांगण्यात आले हाेते.

बातम्या आणखी आहेत...