आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Khadse Along With Gopinath Munde Expanded BJP From Zero In The State, The Instinct To Sideline Him Is From Delhi: Prithviraj Chavan

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुणे:खडसेंनी गोपीनाथ मुंडेसोबत भाजपचा राज्यात शून्यातून विस्तार केला, त्यांना बाजूला करण्याचा डाव दिल्लीतूनच : पृथ्वीराज चव्हाण

पुणेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • एकनाथ खडसे काँग्रेसमध्ये ते आले तर चांगलेच आहे - चव्हाण

भाजप नेते एकनाथ खडसे यांनी भाजपचा दिवंगत नेते गाेपीनाथ मुंडे यांच्यासाेबत राज्यात शून्यातून विस्तार केला. मात्र, भाजपने त्यांना सन्मानाची वागणूक दिली नाही. त्यांचा दाेष असेल तर त्यांना दंड करून लवकर माेकळे करणे आवश्यक हाेते. परंतु खडसे यांना दबाव टाकून दूर करण्याची हिंमत राज्यातील नेतृत्वात नसून हे षड्यंत्र दिल्लीतून झाले आहे. त्याशिवाय त्यांची ही अवस्था कोणी करू शकत नाही. काँग्रेसमध्ये ते आले तर चांगलेच आहे, असे माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.

स्मार्ट सिटी प्रकल्प चुकीचा असून त्याऐवजी आैद्याेगिक शहरे निर्माण करणे आवश्यक हाेते. सुनामीच्या घटनेनंतर २००५ मध्ये राष्ट्रीय आपत्ती यंत्रणा निर्माण करण्यात आली. परंतु त्याकडे यूपीए सरकारनंतर भाजपने लक्ष न दिल्याने आपत्ती आल्यानंतर यंत्रणा सक्षम नसल्याचे दिसून येते.

धार्मिक संस्थांकडून निधी कर्जस्वरूपात घ्यावा : 

देवस्थानचा निधी, साेने सरकारने वापरासाठी घ्यावे, असे विधान पृथ्वीराज चव्हाण यांनी नुकतेच केले हाेते. त्यानंतर गदाराेळ उठला हाेता. याबाबत चव्हाण म्हणाले, देवस्थान याचा अर्थ सर्व धार्मिक संस्थांकडील साेने, निधी कर्जस्वरूपात सरकारने घ्यावा आणि त्याचे व्याज परतफेड करण्यात येईल, अशी विनंती धार्मिक स्थळांना करावी. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी अणुचाचणीनंतर आर्थिक निर्बंध आल्यानंतर १९९९ मध्ये प्रथमच अशी मागणी केली. नंतर २०१५ मध्ये नरेंद्र माेदी व अरुण जेटली यांनीही हीच संकल्पना मांडली. मात्र, मी याबाबत मागणी केल्यानंतर भाजप नेते त्यांच्याच दोन पंतप्रधानांनी धार्मिक स्थळांचे साेने स्वीकारले हाेते, या वस्तुस्थितीकडे डाेळेझाक करत आहेत.

सध्या सर्व अधिकार नाेकरशाहीलाच आहेत

सध्या सर्व अधिकार नाेकरशाहीला दिलेले दिसून येतात. परंतु त्यात लाेकप्रतिनिधी कुठे दिसून येत नाहीत. समाजातील घडामोडींची कल्पना वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांना नसते. यापुढील काळात महाराष्ट्रासमाेर आर्थिक आव्हान उभे राहिले असून त्यासाठी दूरदृष्टी असलेले नेतृत्व पाहिजे.

वाधवान प्रकरणात शिक्षा व्हायला हवी होती

वाधवान बंधूंना दिलेल्या प्रवासासाठीच्या परवानगीबाबत गृहमंत्री यांनी केवळ समज देऊन त्यांना सोडले. त्यांना काहीतरी शिक्षा होणे गरजेचे होते. अमिताभ गुप्ता यांच्यापुरता हा प्रश्न मर्यादित नसून नागरिकांना वेळेत न्याय मिळणे महत्त्वाचे आहे. - पृथ्वीराज चव्हाण

बातम्या आणखी आहेत...