आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीका:खाेक्याचा वापर करणाऱ्यांनी वर्षानुवर्षे राज्याची लावली वाट : चंद्रकांत पाटील

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

खाेक्याचे विषय असतील तर ते बंद खाेलीत चर्चा हाेऊन मिटू शकतात, त्याकरिता बाहेर चर्चा करण्याची गरज नाही, असा टाेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपला रवी राणा-बच्चू कडू यांच्यातील वादाच्या पार्श्वभूमीवर लगावला हाेता. परंतु याचा समाचार घेताना मंत्री चंद्रकांत पाटील पत्रकारांशी बाेलताना म्हणाले, खाेक्याचा अर्थ आमच्या सर्वसामान्यांच्या दृष्टीने आंब्यासाठीचे खाेके, एखाद्या वस्तूसाठीचे खाेके इतकाच हाेताे. परंतु खाेक्याचा विराेधकांना माहिती असणारा अर्थ त्यांनी घेतल्याने वर्षानुवर्षे राज्याची वाट लागलेली आहे. खाेके काेणी काेणाला दिले, खाेक्याचा वापर काेणी केला, याबाबत टीका करणाऱ्यांचे माझ्याकडे दहा विषय असून ते आगामी काळात आम्ही उपस्थित करू. एखादे टेंडर का निघाले, ते काेणाला दिले गेले, कशा प्रकारे नियम डावलले, याबाबत वेगवेगळ्या खात्यांकडे ढीगभर विषय आहे, असा प्रतिटाेला त्यांनी लगावला आहे.

मनपा निवडणुकीवर पाटील म्हणाले, संबंधित विषय न्यायालयीन प्रक्रियेत आहे. त्यावर भाष्य करणे याेग्य नाही. गुजरातच्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष पुन्हा सत्तेवर येईल, अशी चर्चा रंगू लागली, याबाबत ते म्हणाले, गुजरातची निवडणूक जवळ आल्यावर ज्यांचे डिपाॅझिट मागील निवडणुकीत जप्त झाले, ते अशा प्रकारे भाष्य करतात. लाेकशाहीत त्यांना वेगवेगळे दावे करण्याचा अधिकार आहे, परंतु सन १९८५ पासून गुजरातमध्ये भाजपशिवाय दुसरा काेणताही पक्ष सत्तेत आलेला नाही. महाराष्ट्रातील भाजप-सेना आणि सहयाेगी पक्षाचे अपक्ष सदस्य यांच्यात काेणते मतभेद असतील, तर त्याबाबतची साेडवणूक करण्यास एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस समर्थ असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.

राहुल गांधींना यश नाही काँग्रेसच्या भारत जाेडाे यात्रेअंतर्गत राहुल गांधी महाराष्ट्राच्या दाैऱ्यावर येत आहेत. याबाबत पाटील म्हणाले, ही यात्रा काँग्रेसची असल्याने तिचे आम्ही स्वागत करण्याचे कारण नाही. प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार असून ते वेगवेगळे माध्यम वापरतात. राहुल गांधीही तसा प्रयोग करत आहेत. गांधी यांनी आतापर्यंत अशा प्रकारे अनेक प्रयाेग करून पाहिले, परंतु त्यांना यश मिळाले नाही.

‘सामना’त सरकारी जाहिरात स्वातंत्र्याच्या अमृतमहाेत्सवी वर्षानिमित्त राज्यात ७५ हजार जणांना राेजगार देण्याचा संकल्प केंद्र व राज्य सरकारने केला असून त्याबाबतची जाहिरात वेगवेगळ्या वृत्तपत्रांना देण्यात आली आहे. मात्र, संबंधित जाहिरात शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या “सामना’ वृत्तपत्रामध्ये छापली गेल्याने वाद-प्रतिवाद सुरू झाले. याबाबत पाटील म्हणाले, सामना हे व्यावसायिक वृत्तपत्र असून या जाहिरातीवर टीका करणे याेग्य नाही. शासनाचे निर्णय सर्वसामान्यांपर्यंत पाेहोचवण्याकरिता विविध वृत्तपत्रांना जाहिरात दिली जाते, त्यानुसार ती “सामना’ला ही दिली गेली आहे. .

सरकारी नोकऱ्यांना मर्यादा, खासगी उद्योगात नोकऱ्या वाढवाव्या लागतील

पुणे | सरकारी खात्यातील विविध रिक्त पदे भरावी, नवीन पदे निर्माण करावी याबाबतची मागणी सातत्याने होते. मात्र, सरकारी नोकऱ्या निर्माण होणे आणि त्याची पूर्तता होणे, यासाठी ठराविक मर्यादा आहेत. कारण संबंधित पदे भरल्यानंतर त्यांच्या पगारासाठी महसुल ही तितका आवश्यक हवा आणि कर वाढवण्यास बंधने आहे. त्याचप्रमाणे अनावश्यक माणसे प्रशासनात भरली, तर अतिरिक्त इतर जण बसून राहतील. त्यामुळे खाजगी क्षेत्रात नोकऱ्यांची संख्या वाढवावी लागेल. यादृष्टीने सरकार कौशल्य विकास, छोट्या कर्जांना प्रोत्साहन, छोट्या उद्योगांना पाठबळ अशा प्रकारच्या उपाययोजना करत असल्याचे मत राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी व्यक्त केले.

देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष झाल्याच्या निमित्ताने पुणे विभागात एकूण ३१६ जणांना गुरुवारी नियुक्ती प्रधान कार्यक्रम पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.

बातम्या आणखी आहेत...