आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात अफजलखान वधाच्या देखाव्याला पोलिसांची परवानगी:गणशोत्सवासाठी संगम मित्र मंडळाकडून परवानगीची मागणी

पुणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गणेशोत्सवात अफजल खान वधाच्या देखाव्याला अखेर कोथरूड पोलिसांनी परवानगी दिली आहे. संगम मित्र मंडळाकडून याबाबत पोलिसांकडे परवानगी मागण्यात आली होती. मात्र, कायदा सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीकोनातून संबंधित वधाच्या देखाव्याला परवानगी नाकारण्यात आली होती. याबाबत पुन्हा कोथरूड पोलिसांनी पत्र माघारी घेत मंडळाला वधाचा देखावा देण्यासाठी परवानगी दिली आहे.

गणेशोत्सव काळात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास भाविकांना दाखविण्यासाठी अफजल खान याचा वध करणारा देखावा सादर करण्याची परवानगी संगम मित्र मंडळाने पोलिसांकडे केली होती. मात्र, वधाच्या हलत्या देखाव्यााला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. याबाबत मंडळाकडून वेळोवेळी पोलिसांकडे वध सादरीकरण करण्यासाठी पाठपुरावा केला. अखेर बुधवारी कोथरूड पोलिसांनी 20 ऑगस्टला दिलेले पत्र मागे घेतले आहे. त्यानुसार गणेशोत्सवात अटींचा भंग होणार नाही, याची दक्षता मंडळाने घेण्याची सूचना पोलिसांनी केली आहे.

कोथरूड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप म्हणाले, गणेशोत्सवात अफजल खानाचा वध हलता देखावा सादरीकरणासाठी संगम मित्र मंडळाने मागणी केली होती. त्यानुसार संबंधित मंडळाने कायदा सुव्यवस्था राखून नियम व अटींचे पालन करीत देखावा करावा अशी सूचना केली आहे.

अशाप्रकारे झाला होता अफजलखानचा अंत

अफजल खानाची उंचीपुरी देहयष्टी होती तरी ही छत्रपती शिवाजी राजे न घाबरता प्रतापगड किल्ला परिसरातील भेटीचे ठिकाण असलेल्या शामियानात पोहोचले. शिवरायांना बघून या शिवबा आमच्या मिठीत या असं म्हणत अफजल खानाने मिठी मारण्यासाठी हात पसरविले आणि त्यांना जवळ बोलविले. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला मिठी मारली. अफजल खान ने त्यांना आपल्या बाहुपाशेत घेण्याचा प्रयत्न केला आणि अफजल खानाने लपविल्या कट्यारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीत वार केला आणि त्यांना आपल्या काखेत दाबण्याचा प्रयत्न केला. छत्रपती शिवाजी महाराज पूर्वी पासून सावध होते. अफजल खानाच्या प्रहाराने छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मुठीतील वाघनखे काढून त्याच्या पोटात घुसवून त्याच्या आतड्याचं बाहेर काढल्या आणि त्याला ठार केले.

अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा आपल्या बुद्धी कोशल्यतेने वध केला. अफजलखानाने "दगा दगा" म्हणत आकांत केला त्याच्या आवाजाला ऐकून बाहेर उभारलेला सय्यद आत आला अफजल खान ला ठार झालेले बघून त्याने दांडपट्ट्याने छत्रपती शिवाजी महाराजांवर हल्ला करण्याच्या प्रयत्न केला. तो पर्यंत जिवा महालाने त्याच्या वाराला निष्फळ करून त्याच्या वर मागून हल्ला करून सय्यद ला ठार मारून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्राणाचे रक्षण केले. "होता जिवा म्हणून वाचला शिवा "असे म्हणतात.

बातम्या आणखी आहेत...