आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हसन मुश्रीफ भाजपच्या रडारवर:हसन मुश्रीफ यांची बेनामी संपत्ती जप्त करा; किरीट सोमय्या यांनी पुण्यात थोपटले दंड, 158 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप

पुणे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर घोटाळ्याचे आरोप करणारे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आता आणखी एका मंत्र्याचा घोटाळा उघडकीस आणण्याचा इशारा दिला आहे. अनिल परब यांचे रिसॉर्ट तोडण्यासाठी प्रतिकात्मक हातोडा घेऊन नुकताच त्यांनी खळबळजनक दापोली दौरा केला होता. या दौऱ्यानंतर किरीट सोमय्यांच्या रडारवर ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ आले आहेत. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना घोटाळा प्रकरणात कारवाईसाठी आज किरीट सोमय्या यांनी पुण्यात दंड थोपटले. हसन मुश्रीफ यांनी 158 कोटींचा घोटाळा केला असून हा पैसा 47 कंपन्यांमधून आला आहे. यामध्ये शेल कंपन्या देखील आहेत, असे किरीट सोमय्या यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

मुश्रीफ कुटुंबीयांकडे 47 कंपन्यांकडून पैसे आलेत. मुश्रीफ यांच्या कुटुंबीयांनी 100 कोटींहून अधिक रुपयांचा आर्थिक व्यवहार केला. हा पैसा कोणत्या कंत्राटदाराकडून आला? याची चौकशी करण्याची जबाबदारी ठाकरे-पवार सरकारची आहे. पण, ते चौकशी करत नाहीत. कारण, हे दोन्ही कुटुंब घोटाळेबाज आहेत, एक घोटाळेबाज दुसऱ्या घोटाळेबाजाला वाचवत आहे, अशी टीका सोमय्या यांनी केली. तसेच हसन मुश्रीफ यांच्यावर कारवाई होईपर्यंत पाठपुरावा करणार, असेही सोमय्या म्हणाले.

केंद्र सरकारची पुणे न्यायालयात तक्रार -

सोमय्या यांनी हसन मुश्रीफ कुटुंब आणि सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याविरोधात केंद्र सरकारने पुणे न्यायालयात तक्रार याचिका दाखल केली आहे. त्यात फसवणूक, शेल कॉससाठी कलम 447 आणि 439 कंपनी कायदा आणि तपास IPC/CRPC कलम 256 अन्वये कारवाईची विनंती केली आहे. पुढील काही दिवसांत यावर सुनावणी होणार आहे. हसन मुश्रीफ यांच्यावर फौजदारी, बेनामी कायदा, आय़कर विभाग, मनी लाँडरींग याअंतर्गत कारवाई सुरू झाली आहे, असे सोमैय्या यांनी सांगितले.

आयकर सदन विभागात पोहचले सोमय्या -

किरीट सोमय्या हे पुण्यातील आयकर सदन या ठिकाणी महाविकास आघाडीतील मंत्री हसन मुश्रीफ यांच्या संदर्भात माहिती घेण्यासाठी पोहोचले आहेत. हसन मुश्रीफ यांनी लुटीचा माल सरकारी तिजोरीत जमा करावा. संजय राऊत यांनी पहिला हप्ता म्हणून 55 लाख रुपये ED कडे भरले आहेत. त्यांच्याकडून मुश्रीफ यांनी काहीतरी शिकावे, असे किरीट सोमय्या म्हणाले.

सोमय्या यांचे टि्वट -

किरीट सोमय्यांनी गुरुवारी ट्विट करत म्हटलं होतं की, श्री हसन मुश्रीफ सेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना घोटाळा कारवाईसाठी माझा उद्या शुक्रवार 1 एप्रिल रोजी पुणे दौरा असेल. दुपारी 4.30 वाजता आयकर आयुक्त इंवेस्टीगेशन पुणे आयकर सदन, सॅलिसबरी पार्क तर 5.30 वाजता रजिस्ट्रार ऑफ कंपनीस पुणे PCNTDA ग्रीन बिल्डिंग, आकुर्डी याठिकाणी असेन.

किरीट सोमय्यांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक -
किरीट सोमय्यांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाले आहे. सोमय्या यांच्या विरोधात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली

बातम्या आणखी आहेत...