आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोपांवर अनिल परबांचे प्रत्त्युत्तर:किरीट सोमय्या म्हणजे कोणती एजन्सी नाही, त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यास मी बांधील नाही

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भाजप नेते किरीट सोमय्या म्हणजे कोणती एजन्सी नाही आणि त्यांना उत्तर देण्यास मी बांधील नाही. ज्या तपास यंत्रणा आहे त्यांना मी उत्तर देत आहे. माझा कोकणातील जमीन व्यवहार पारदर्शक असून विभास साठे यांच्याकडून मी जमीन विकत घेतली आणि पुढे त्याची विक्री केली आहे. सोमय्या यांना कोणत्या तक्रारी असतील तर त्यांनी संबंधित यंत्रणाकडे तक्रारी कराव्या, असे मत राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

परब म्हणाले, महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने 75 व्या वर्षात पदार्पण केले आहे. पहिली बस ज्या दिवशी धावली त्याचे औचित्य साधून त्याच मार्गावर पहिली ई बस सुरू करण्यात आली आहे. ज्याएसटी कर्मचारी यांनी मागील 25 वर्ष कोणताही अपघात न करता सेवा दिली त्यांचा 25 हजार रुपये देवून सत्कार करण्यात आला आहे. गेल्या अनेक वर्ष एसटी स्थानकावर खर्च नाही. प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यासाठी अद्यावत बस स्थानक तयार करण्यात येईल. बांधा वापरा आणि हस्तांतरित करा या तत्त्वावर हे काम करण्यात येणार आहे. दुर्देवाने एसटी बस पोर्ट औरंगाबाद आणि पनवेल येथे मान्यता मिळालेली नाही. एसटी पूर्वपदावर येत असून लवकरच चांगल्या सुविधा देण्यात येतील.

पुढे त्यांनी माहिती दिली की, पुण्यातील शिवाजीनगर स्थानक याठिकाणी मेट्रो काम सुरू असून त्याजागी नवीन स्थानक निर्मिती बाबत चर्चा सुरू आहे. ई बस पहिल्या टप्प्यात 150 मिळणार असून त्या कोणत्या जागी नेम्याच्या आहे त्याबाबत अभ्यास करून सेवा सुरू केली जाईल. ई बस चालवताना त्यासोबत पायाभूत सुविधा महिन्याभरात तयार करण्याबाबत अभ्यास पूर्ण होईल. कोरोना पूर्व सेवा जवळ आम्ही पोहचत आहे. एसटी स्थानक वरील खासगी सेवा हळूहळू बंद करण्यात येत आहे.

इंधन खर्च अधिक वाढला

परब म्हणाले, इंधन खर्च मोठ्या प्रमाणत वाढला आहे. वर्षभरात सीएनजीच्या एक हजार बस सेवेत आणणार आहे. ई बस, सीएनजी बस सेवा करण्यात येणार आहे. ज्या मार्गावर प्रवासी कमी आहे. त्याजागी कमी फेऱ्या करण्यात येऊन इंधन वाचविण्यात येणार आहे. इंधन खर्च एसटी तोट्यात जाण्यासाठी एक कारण आहे. त्यामूळे त्यावरील खर्च कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. एसटीला सध्या 11 हजार कोटीचा तोटा आहे, असे यावेळी शेखर चेन्न यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...