आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराखासदार संजय राऊत यांचे व्यवसायिक भागीदार सुजित पाटकर यांच्या लाईफ लाईन हॉस्पिटल कंपनीने कोणताही अनुभव नसताना पुणे जम्मू-कोविड सेंटरचा कॉन्ट्रॅक्ट घेऊन मोठा गैरव्यवहार केला आहे. त्यामुळे निष्कारण नागरिकांच्या जीवाशी खेळ झाला, याप्रकरणी पोलिसांनी मुंबई प्रमाणेच पुढील सात दिवसात पाटकर यांच्या कंपनी विरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी माजी खासदार आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
पुण्यातील शिवाजीनगर जंबो कोवीड सेंटर येथे सुजित पाटकर यांच्या लाईफ लाईन हॉस्पिटल कंपनी घोटाळा विरुद्ध शिवाजीनगर पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल केल्यानंतर ते बोलत होते. मुंबई पोलिसांनी जंबो कोवीड सेंटर घोटाळा बाबत एफआयआर दाखल केली असून पुणे पोलिसांनी
एफआयआर दाखल करावी अशी मागणी त्यांनी केली. यावेळी पुणे भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक,माजी नगरसेवक दत्ता खाडे, पुष्कर तुळजापूरकर उपस्थित होते.
किरीट सोमय्या म्हणाले, जुलै 2020 मध्ये जंबो कोविड सेंटर सुरू करण्याची योजना महाराष्ट्र शासनाने राबवली. मुंबई येथे मुंबई महापालिकेने तसेच पुणे येथे पीएमआरडीए आणि पुणे महापालिका द्वारा जम्बो-कोविड सेंटर उभारण्यात आले. शिवाजीनगर येथे उभारण्यात आलेले कोविड सेंटर चालवण्याचे कॉन्ट्रॅक्ट लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्विसेस या सुजित पाटकर यांच्या कंपनीला तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने देण्यात आले.
त्यानंतर पीएमआरडीएने याबाबत कॉन्ट्रॅक्ट दिले. मात्र, माहिती अधिकारात आम्हाला लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्विसेसने रीतसर अर्ज केल्याचे ,तसेच कंपनी केव्हा स्थापन झाली, अनुभव किती व तीन वर्षाचे टाळेबंद अशी कोणती माहिती दिलेली नाही. लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंटने केवळ एक प्रेझेंटेशन पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला दिले असल्याचे दिसते. त्यावर आधारित 800 बेडचे जंबो कोविड सेंटरचे कॉन्ट्रॅक्ट त्यांना दिले गेले ही गंभीर बाब आहे. पीएमआरडीए व टास्क फोर्सने जे नियम बनवले होते त्या सर्वांना लाईफ लाईन हॉस्पिटलने दुर्लक्षित केले.
केवळ आठ दिवसात शिवाजीनगर जम्बो कोविड सेंटर मध्ये गोंधळ सुरू झाला. डॉक्टर नाही ,अनुभवी डॉक्टर्स नाही, इतर पॅरामेडिकल स्टाफ नाही म्हणून रुग्णांचे हाल झाले. काही दिवसातच तीन रुग्णांचा कंपनीच्या बेजबाबदारपणामुळे मृत्यू झाला. त्यावर पुणे महापालिकेने दोन सप्टेंबर 2020 रोजी पीएमआरडीला यासंबंधी तक्रार व अहवाल पाठवला.तसेच लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्विस मध्ये क्षमता नाही तरी त्यांनी काम चालू ठेवले आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.
त्यानुसार नऊ सप्टेंबर 2020 रोजी पीएमआरडीएने संबंधित कंपनीला कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्याचे आदेश दिले तसेच त्यामध्ये कंपनीला काळे यादी टाकून इतरत्र कुठेही काम करू नये असे सांगण्यात आले.मात्र, त्यानंतर ही वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांनी सदर कंपनीला वरळी जंबो कोविड सेंटरचे अतिदक्षता विभागाचे काँट्रॅक्ट दिले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.