आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय वर्चस्वातून:जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांचा खून; नगरपरिषदेबाहेर गोळीबार करून कोयत्याचे वार

पुणे17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथील जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांच्यावर राजकीय वर्चस्वातून चार हल्लेखोरांनी शुक्रवारी दुपारी नगरपरिषदेबाहेर गोळीबार करून कोयत्याने वार केले. यात त्यांचा मृत्यू झाला.

हल्ल्याच्या घटनेत आवारे यांना दोन गोळ्या लागल्या. त्यातील एक गोळी डोक्यात लागल्याने त्यांना सोमाटणे फाटा येथील पावना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचे प्राण वाचू शकले नाहीत.

किशोर आवारे यांच्यावर गोळीबार झाल्याचे समजतात तळेगाव परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठा पोलीस फौजफाटा तैनात केला आहे. किशोर आवारे शुक्रवारी दुपारी मारुती मंदिरे येथील तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या कार्यालयात मुख्याधिकारी यांना भेटण्यासाठी आलेले होते. मुख्याधिकारी यांना भेटून झाल्यानंतर ते नगरपरिषदेच्या कार्यालयातून बाहेर पडत असताना त्यांच्यावर दबा धरून बसलेल्या दोन हल्लेखोरांनी गोळीबार केला, तर दोन हल्लेखोरांनी कोयत्याने वार केले.

हल्ल्यात आवारे गंभीर जखमी झाले. ते रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर संबंधित आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. आवारे यांना सोमाटणे फाटा येथील पावना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. हल्ल्याची माहिती मिळताच, तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्याचे पोलिस यांच्यासह मोठा पोलीस फौज फाटा घटनास्थळी दाखल झाला. याबाबत पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलीस करत आहेत.