आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआयपीएलमध्ये कलकत्ता नाईट रायडर्स (केकेआर) विरूद्ध रॉयल चॅलेंज बंगळुरू (आरसीबी) या संघातील क्रिकेट सामन्यावर बुकिंग घेणाऱ्या संशयिताला येरवडा परिसरातून अटक करण्यात आली. आकाश धरमपाल गोयल (वय -३० , रा, लोहगाव, पुणे ) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे आरोपीचे नाव आहे.
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट-तीनचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार हे हनुमान जयंती उत्सव अनुषंगाने कोथरूड पोलीस ठाणे हददीत रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासत असताना, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्रीहरी बहिरट यांना मिळालेल्या माहितीनुसार, इंडीयन प्रिमीयर लीगच्या (आयपीएल) कलकत्ता नाईट रायडर्स (केकेआर) विरूध्द रॉयल चॅलेंज बंगळुरू (आरसीबी) या संघाच्या मॅचवर आकाश गोयल बुकिंग घेत होता. त्याला पोलिसांनी येरवडा परिसरातून जेरबंद केले.
याप्रकरणी आकाश धरमपाल गोयल व त्याच्याकडे खेळणाऱ्या चार व्यक्तीविरूद्ध येरवडा पोलिस ठाणे येथे महाराष्ट्र जुगार अधिनियम १२ ( अ ) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. संशयिताकडून सट्टा घेण्याकरीता वापरत असलेला मोबाईल हॅन्डसेट पोलिसांनी जप्त केला आहे.
संशयित आरोपीचा गुंजन टॉकिज परीसरात शोध घेताना, संशयितास येरवडा स्मशान भुमी शेजारी असलेल्या भोला पान शॉपजवळ येथून त्यास ताब्यात घेण्यात आले. आरोपीच्या मोबाईलची पाहणी करता तो ३१ मार्चपासुन इंडीयन प्रिमीयर लीगच्या झालेल्या क्रिकेट मॅचचे कालावधीत सट्टा घेत असल्याचे आढळले आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार,सह पोलीस आयुक्त संदिप कर्णिक,अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उप- आयुक्त गुन्हे, अमोल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे एकचे सुनिल पवार यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट तीनचे प्रभारी अधिकारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्रीहरी बहिरट यांच्या पथकाने केली आहे. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा युनिट तीनचे सहा. पोलीस उप-निरीक्षक, संतोष क्षीरसागर करीत आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.