आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुन्या पेन्शनसाठी कोल्हापुरात हजारो कर्मचारी एकवटले:आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वात काढला धडक मोर्चा

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राजस्थान, छत्तीसगड आणि हिमाचल प्रदेशात जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. त्यानंतर आता महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांनीही जून्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी कोल्हापुरात आंदोलन केले आहे.

राष्ट्रीय पेन्शन योजना (एनपीएस) मोडीत काढून, जुनी पेन्शन सर्वांनाच लागू करण्यात यावी, या मागणीसाठी कोल्हापूरमध्ये गांधी मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय असा महामोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांचाही उपस्थिती दिसून आली आहे.

आमदार सतेज पाटील यांनी येत्या अर्थसंकल्पात जुनी पेन्शन लागू करण्याची मागणी केली.

कर्मचाऱ्यांकडून 14 मार्चपासून जाहीर करण्यात आलेल्या काम बंद आंदोलनाला त्यांनी पाठिंबा दिला. पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्च्यामध्ये हजारो कर्मचाऱ्यांसह त्यांचे कुटुंबीयही या मोर्च्यात सहभागी झाले.

'एकच मिशन जुनी पेन्शन' अशा घोषणा देत हे आंदोलन केल जात आहे. सरकारी अधिकारी मंचाचे राज्य संघटक अनिल लवेकर म्हणाले, "राज्य सरकारने 1982 ची जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशी आमची मागणी आहे.

तमिळनाडू, ओरिसा, राजस्थान या राज्यात जुनी पेन्शन योजना लागू होत असेल तर, महाराष्ट्रात का नाही असा सवाल उपस्थित करत आमदार सतेज पाटील यांनी, महाराष्ट्र सरकारने दुटप्पीपणा करू नये, असा हल्लाबोल राज्य सरकारवर केला आहे.

बातम्या आणखी आहेत...