आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Kool ex Cold Chain Ltd In Pune Prepared To Transport The COVID19 Vaccines From Serum Institute Of India To Other Parts Of The Country.

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लसीकरणाची तयारी:कोरोना लसीकरणासाठी पुण्यात जय्यत तयारी, लसीच्या वाहतुकीसाठी अत्याधुनिक ट्रक्स सज्ज

पुणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कुल एक्स कोल्ड चेन लिमिटेडकडून सीरम कंपनीतून देशाच्या अन्य भागांत लसीची वाहतूक केली जाणार

देशभरात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात होणार आहे. केंद्र सरकारने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) डोस पुरवण्याचीही ऑर्डर दिली आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाची लस तयार होत असलेल्या पुण्यात लसीच्या वाहतुकीसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.

सीरम कंपनीतून देशाच्या इतर भागांत लसीची वाहतूक करण्याचे काम कुल एक्स कोल्ड चेन लिमिटेड या कंपनीला देण्यात आले आहे. त्यासाठी कंपनीने तापमान नियंत्रित करण्याची क्षमता असलेले ट्रक्स सज्ज ठेवले आहेत. या अत्याधुनिक ट्रक्समध्ये उणे 25 अंश ते + 25 अंश सेल्सिअस दरम्यान तापमान नियंत्रित करण्याची सुविधा आहे. तसेच प्रत्येक ट्रक हा अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज आहे. कोरोना लसीच्या वाहतुकीदरम्यान या ट्रक्सना संबंधित राज्याच्या पोलिसांकडून सुरक्षा पुरवली जाईल अशी माहिती कंपनीच्या संचालकांनी दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...