आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरेगाव भीमा:जयस्तंभ परिसरात शंभर एकर जागेत राष्ट्रीय स्मारक उभारणार : रामदास आठवले

पुणेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

“कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक जयस्तंभ परिसरातील शंभर एकर जमीन संपादित करून तेथे भव्य राष्ट्रीय स्मारक उभारावे. त्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने ५० ते १०० कोटींचा निधी मिळवून देण्याचा माझा प्रयत्न राहील. राज्य सरकारने १०० कोटींचा आराखडा तयार केला आहे. राज्य आणि केंद्र सरकारच्या सहकार्यातून जयस्तंभ परिसरात भव्य स्मारक उभारण्यासाठी प्रयत्न करणार आहे,’ असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले. शनिवारी २०४ व्या शौर्य दिनानिमित्त रामदास आठवले यांनी कोरेगाव भीमा येथील जयस्तंभास पुष्पचक्र अर्पण करत अभिवादन केले.

आठवले म्हणाले, १ जानेवारी १८१८ रोजी कोरेगाव भीमा येथे ५०० महार शूर सैनिकांनी महापराक्रम गाजवत ४० हजार पेशवे सैन्याला पराभूत केले होते. त्या शौर्याचे प्रतीक म्हणून येथे उभारण्यात आलेल्या जयस्तंभाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर दरवर्षी अभिवादन करण्यास येत. आपल्या पूर्वजांच्या शौर्याचा इतिहास भावी पिढीला प्रेरणा देत राहील म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संदेशामुळे दरवर्षी आंबेडकरी जनता कोरेगाव भीमा येथील जयस्तंभाला अभिवादन करण्यास येते.

बैलागाडा शर्यत रद्द केल्याने आढळराव नाराज :सर्वाच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतींना सशर्त परवानगी दिल्यानंतर आंबेगाव, मावळ येथे बैलगाडा शर्यतीचे एक जानेवारी राेजी आयाेजन करण्यात आले हाेते. परंतु जिल्हाधिकारी यांनी वाढत्या काेराेना रुग्णसंख्येमुळे बैलगाडा शर्यतींना परवानगी नाकरली. याबाबत अजित पवार म्हणाले, काेराेनामुळे राज्यावर आलेले संकट माेठे असून आपण अशा कार्यक्रमांना मुरड घातली पाहिजे. दरम्यान, शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी एैनवेळी बैलगाडा शर्यत रद्द झाल्याने नाराजी व्यक्त करत शर्यतीचे घाटात कार्यकर्त्यांसमवेत निषेध केला.

काेरेगाव भीमाचा इतिहास पराक्रमाचा : अजित पवार
काेराेगाव भीमा येथील जयस्तंभास अभिवादन केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, महाराष्ट्राला शाैर्याचा, पराक्रमाचा इतिहास आहे. इतिहासाची पाने पाहिली तर आपल्याला पुण्यातही हेच दिसते. काेरेगाव भीमा येथे जे शूरवीर शहीद झाले त्या सर्वांना मी अभिवादन करताे. हा इतिहास पुढच्या पिढीलाही स्मरणात राहावा आणि परिसराचा विकास व्हावा यासाठी यंदाच्या अधिवेशनात घाेषणा केल्याप्रमाणे शासकीय समिती करण्यात आली आहे. स्मारकाचा विकास करण्यासाठी जागा संपादित करणे, चांगल्या प्रकारची पार्किंग व्यवस्था निर्माणावर भर राहील.

बातम्या आणखी आहेत...