आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरेगाव भीमाला शौर्य दिन साजरा:जयस्तंभला अभिवादन करण्यासाठी पेरणे फाट्यावर लोटला लाखोंचा जनसागर

प्रतिनिधी | पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुखांनी केले सर्वांचे गुलाबपुष्पाने स्वागत

कोरेगाव भीमा (तालुका शिरूर) येथे शौर्य दिनानिमित्त जयस्तंभ अभिवादनासाठी रविवारी जनसागर लोटला होता. सकाळपासून सायंकाळपर्यंत लाखो अनुयायी पेरणे फाट्यानजीकच्या जयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी जमले होते. जयस्तंभ अभिवादन परंपरेचा इतिहास मोठा आहे. त्यामुळे दरवर्षी एक जानेवारी रोजी लाखो भीमसैनिक आणि आंबेडकरवादी आवर्जून या ठिकाणाला भेट देऊन आठवणी जागवतात. प्रशासनानेदेखील या अभिवादन उपक्रमासाठी मोठी पूर्वतयारी केली होती. पहाटे ६ वाजता धम्म प्रार्थना तसेच बुद्धवंदना झाली. समता सैनिक दल, महार बटालियन यांच्यातर्फे सलामी व मानवंदना देण्यात आली. त्यानंतर जयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी अनुयायी, राजकीय पक्ष, सामाजिक व सांस्कृतिक संस्थांनी गर्दी झाली.

स्मारकासाठी १०० एकर जमीन संपादित करा भीमा कोरेगाव (जि. पुणे) येथील ऐतिहासिक विजयस्तंभास अभिवादन करण्यास दरवर्षी १ जानेवारीला शौर्यदिनी देशभरातून लाखो आंबेडकरी अनुयायी भेट देत असतात. त्यामुळे या विजयस्तंभाचे भव्य स्मारक उभारले पाहिजे. त्यासाठी विजयस्तंभ परिसराची १०० एकर जमीन शासनाने संपादित करावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली. रविवारी मंत्री आठवले यांनी भीमा कोरेगाव येथे ऐतिहासिक विजयस्तंभास अभिवादन केले.

दिवसात २ हजार ८०० बसफेऱ्या पीएमपीएमएलने लोणीकंद आणि कोरेगाव भीमा अशा दोन्ही बाजूने प्रत्येकी १४० बसेस सुरू केल्या होत्या. बसेसच्या सकाळी ११ वाजेपर्यंत सुमारे २ हजार ८०० फेऱ्या झाल्याची माहिती पीएमपीएमएलचे व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे यांनी दिली. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आणि पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी वाहनतळावर आलेल्या अनुयायांशी संवाद साधला व गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत केले.

बातम्या आणखी आहेत...